फेमस

रतन टाटांचा, त्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान; त्यासाठी आसामचे मुख्यमंत्री आले मुंबईत

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी मुंबईत येऊन उद्योगपती, समाजसेवक आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचा सन्मान केला आहे.

Ratan Tata : रतन टाटा यांचा ‘आसाम वैभव’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुंबईत येऊन रतन टाटांची भेट घेतली आणि रतन टाटांना ‘आसाम वैभव’ पुरस्कार देऊ केला. ‘आसाम वैभव’ हा आसामचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. वैयक्तिक कारणांमुळे रतन टाटा 24 जानेवारी रोजी गुवाहाटी येथील श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथे आयोजित अधिकृत पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत, म्हणून तिथले मुख्यमंत्री थेट मुंबईला आले.

मुंबईत आल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी उद्योगपती, समाजसेवी आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘आसाम वैभव’ प्रदान केला. आसामच्या मुख्यमंत्री कार्यालयाने बुधवारी सकाळी लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी गेले आणि आसामच्या लोकांच्या वतीने ‘क्वीन ऑफ मेलडी’ यांना आदरांजली वाहिली.

आसाम सरकारने टोकियो ऑलिम्पिक पदक विजेती लव्हलिना बोरगोहेन, कोरोना योद्धा, कलाकार, उद्योजक, डॉक्टर यांच्यासह 17 प्रतिष्ठित व्यक्तींना आसाम सौरव हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊ केला. आसाम वैभव पुरस्कारासाठी नामांकित झालेले रतन नवल टाटा आणि आसाम सौरव पुरस्कारासाठी नामांकन झालेले दीपक चंद जैन या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments