बीएमसी

underground water mining : सलग दुसऱ्या महिन्यात भूमिगत जलबोगदा खनन कामात BMC ची विक्रमी कामगिरी

जलबोगदा प्रकल्प अंतर्गत सलग दुसऱ्या महिन्यात बोगदा खनन कामांमध्ये विक्रमी कामगिरीची नोंद झाली आहे.

underground water mining : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या अमरमहाल ते ट्रॉम्बे आणि अमरमहाल ते परळ जलबोगदा प्रकल्प अंतर्गत सलग दुसऱ्या महिन्यात बोगदा खनन कामांमध्ये विक्रमी कामगिरीची नोंद झाली आहे. पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत सुरु असलेल्या या भूमिगत जल बोगदा प्रकल्पांच्या खनन कामात नवीन उच्चांक नोंदवण्यात आला आहे. मागील महिन्यात म्‍हणजेच डिसेंबर मधील 526 मीटर खनना नंतर अमरमहाल ते परळ जलबोगदा कामामध्ये जानेवारी महिन्यात तब्बल 605 मीटर खनन काम करण्‍यात आले. यामुळे फक्‍त 115 दिवसांच्‍या अल्‍पावधीत 1.7 कि.मी. इतके अंतर पार करण्यात आलं आहे.

एवढेच नव्हे तर अमरमहाल ते ट्रॉम्बे या दुसऱया बोगद्याच्या कामामध्ये जानेवारी महिन्यात तब्बल 653 मीटर खनन करतेवेळी एकाच दिवसात 40 मीटरपेक्षा अधिक खनन करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा करण्याची किमया महानगरपालिकेने साध्य केली आहे. तसेच या मार्गिकेवर 3.10 कि.मी. म्‍हणजेच 58 टक्के काम पूर्ण झाले आहे. पाणीपुरवठा प्रकल्प खात्याने ही कामगिरी केल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी कौशल्याची सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.

पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत हे दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत.

हे दोन्ही बोगदे जमिनीखाली सुमारे 100 ते 110 मीटर खोलीवर बांधण्यात येत असून त्यांचा व्यास 3.2 मीटर इतका आहे. या दोन्ही बोगद्यांमधून येणाऱ्या भूमिगत जलवाहिन्या ह्या भूपृष्ठावरील मुख्य जलवाहिनी आणि सेवा जलाशय यांना जोडल्या जाणार आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments