राजकारण

माईक बंद करायचं संजय राऊत विसरले आणि त्यांची चर्चा आली समोर

'इंटरनॅशनल पत्रकार परिषद' असा उल्लेख संजय राऊत यांनी स्वत: पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला केला होता.

Sanjay Raut Mike :  ED सह भाजपचे नेत्यांना सडकून उत्तर देण्यासाठी इंटरनॅशनल पत्रकार परिषद घेतली. ‘इंटरनॅशनल पत्रकार परिषद’ असा उल्लेख संजय राऊत यांनी स्वत: पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला केला होता. या परिषदेमध्ये राऊतांनी किरीट सोमय्या यांच्यावर मोटे आरोप केले, इतकच नाही, तर त्यांच्या संबंधातील अनेक नेत्यांवर आणि सोमय्यांच्या मुलावरही आरोप केले.

भाजपच्या अनेक नेत्यांना संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. हे सगळं संपल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांना जय महाराष्ट्र केला. आपल्या खुर्चीवरून उठले, आणि कदाचित ते विसरले की त्यांच्या कपड्यांवर लावलेला लेपल माईक तसाच सुरु राहिला होता. त्यांच्या लक्षात आल्यानंतर संजय राऊतांनी तो माईक काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निघत नसल्याने राऊत यांनी अनेकांची मदत घ्यायचं ठरवलं.

अशा सगळ्या गडबडीत संजय राऊत यांनी आपल्या सहकाऱ्यांना पत्रकार परिषद कशी झाली, याचा रिव्ह्यू मागायला सुरुवात केली. सगळं ओके झालं ना, असा सवाल ते अनेकांना करू लागले. किशोरी पेडणेकर, प्रताप सरनाईक, अनिल देसाई, खासदार विनायक राऊत असे अनेकजण तिथे उपस्थित होते. त्या सगळ्यांना संजय राऊत विचारत होते की पत्रकार परिषद कशी झाली? असं असताना संजय राऊत, अनिल देसाई आणि खासदार विनायक राऊत यांच्या चर्चा सुरु होती. ती चर्चा नेमकी काय झाली, तेही पाहू,

संजय राऊत – ओके झालं का?
विनायक राऊत – परफेक्ट आहे
अनिल देसाई – एकदम मस्त झालं, परफेक्ट झालं.
अनिल देसाई – याच्यापेक्षा जास्त बोलायचं नाही, आणि बस झालं
संजय राऊत – नो क्वशन अन्सर
विनायक राऊत – क्वशन अन्सरची गरजच नाही

या संभाषणामुळे अनेकजण तितकाच व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. म्हणून आम्हीही ही क्लिक तुमच्यासाठी इथे देत आहोत. हा व्हिडीओ 50 मिनिटे 54 सेकंदांचा आहे. त्यातील 49 मिनिटांनंतर हा संपूर्ण संवाद पाहता येईल.

&;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments