Uncategorized

Sanjay Raut On BJP Leader : कुठल्या BJP नेत्याने मुलीच्या लग्नात साडेनऊ कोटींचं कारपेट टाकलं, नाव आलं समोर

संजय राऊत नऊ कोटींचं नाही तर नऊ लाखांचं कार्पेट म्हणाले.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या संजय राऊत यांनी अखेर पत्रकार परिषद (Sanjay Raut On BJP Leader) घेतली. फक्त भाजपच नाही तर ED वरही तंग खेचून संजय राऊत यांनी संपूर्ण सुफडा साफ करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत ED कडून झालेल्या कारवाया, केंद्र सरकारकडून आलेला दबाव हाच या पत्रकार परिषदेमागचा उद्देश होता. (Shivsena Press Conference)

ईडीला आमची गुंट्यामध्ये असलेल्या जमिनीकडे लक्ष आहे, माझ्या मुलीच झालेलं लग्न यावर देखील ईडीने चौकशी केली। यामध्ये मेहंदीवाला, नेलपॉलिशवाला, टेलर यांची चौकशी केली. पण भाजपाच्या काळात वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नात ते वनमंत्री असल्याने जंगलाचे डेकोरेशन करण्यात आलं होतं. या डेकोरेशनमध्ये कार्पेटचा खर्च 9 कोटी करण्यात आला होता. व आम्ही त्यावेळी बोललो नाही कारण राजकारण आहे. आम्हाला कोणाच्या घरात घुसायच नाही. यावर भाजप नेते आणि माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे.

यावर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिउत्तर दिलं आहे ते म्हणाले…

मी चाणक्य आहे असा अभास संजय राऊतांना झाला आहे. राऊतांच्या ईडी मागे लागली हे मला माहीत नाही. राज्य सरकारने माझ्या मुलीच्या लग्नातील खर्चाची चौकशी केली आहे. आपल्यावर आरोप झाले म्हणून माझ्यावर आरोप करू नये. तुमच्या सरकारकडे अहवाल आहे. त्यावेळी दोन समित्या देखील नेमण्यात आल्या होत्या. अशी प्रतिक्रिया TV9 मराठीशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. यात महत्त्वाचं म्हणजे, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा आहे की, नऊ लक्ष रुपये आहेत, नऊ कोटी नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments