Uncategorizedराजकारण

Sanjay Raut Press Conference : माझ्या मुलीच्या मेहेंदी वालीची देखील ED कडून चौकशी, पण…

मुलुंडच्या एका टेलरकडे आमचे कपडे शिवले तिकडेही जाऊन चौकशी केली पण ईडीला काहीही मिळालं नाही

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या संजय राऊत यांनी अखेर पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference) घेतली. फक्त भाजपच नाही तर ED वरही तंग खेचून संजय राऊत यांनी संपूर्ण सुफडा साफ करण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत ED कडून झालेल्या कारवाया, केंद्र सरकारकडून आलेला दबाव हाच या पत्रकार परिषदेमागचा उद्देश होता. (Shivsena Press Conference)

भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रताप सरनाईक अशा अनेक नेत्यांना टार्गेट केलं होतं. त्यामुळे वाघाला डिवचल्याचं चित्र संजय राऊत (Sanjay Raut On BJP Leader) यांनी उभं करण्याचा प्रयत्न त्यांच्या या पत्रकार परिषदेमधून समोर आला.

या पत्रकार परिषदेआधी महाराष्ट्रातील इतर ठिकाणांहून अनेक शिवसैनिक शिवसेना भवनासमोर जमले होते. काहींनी तर शिवसेनेच्या वेगळ्या घोषणा असलेली टी शर्ट्सदेखील अनेक शिवसैनिकांनी घातले होते. शिवसेना भवनासमोर अनेक शिवसैनिक जमले असल्याने मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शिवसैनिकांमुळे दादरच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं.

ईडीनं त्यांच्या कुटुंबीयांवर केलेल्या कारवाईविषयी संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. ईडीनं मुलीच्या लग्नाच्या (Sanjay Raut Daughter Wedding) चौकशीत मेहंदीवाल्याला देखील सोडलं नाही, टेलरकडेही जाऊन चौकशी केली, असं राऊत यावेळी म्हणाले. माझ्या मुलीचं लग्न झालं त्यावेळी मेहंदी आणि नेलपॉलिश वाल्याकडे जाऊन त्यांची चौकशी केली यांनी तुम्हाला पैसे किती दिले. मुलुंडच्या एका टेलरकडे आमचे कपडे शिवले तिकडेही जाऊन चौकशी केली पण ईडीला काहीही मिळालं नाही असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला.

आनंद अडसूळ वारंवार सांगतायत की मी निर्दोष आहे. पण तरी त्यांची बदनामी करत राहायचं. भावना गवळी, रवींद्र वायकर, अनिल परब आणि सगळं झाल्यानंतर माझ्यावर आले, कितीही चौकश्या लावल्या तरी मी घाबरणार नाही असंही संजय राऊत म्हणाले. फक्त चप्पलवाल्याकडे जाऊन ईडीने चौकशी केलेली नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments