फेमस

लतादीदींसमोर शाहरुखने असं काही केलं की कौतुक होऊ लागलं…

लता मंगेशकर यांचं पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून पहिल्यांदा त्यांच्या घरी प्रभूकुंजला नेण्यात आलं, तिथे त्यांच्या कुटुंबियांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

Shahrukh khan Namaz : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8.12 वाजता निधन झाले. त्यानंतर संपूर्ण जगातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लता मंगेशकर यांचं पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून पहिल्यांदा त्यांच्या घरी प्रभूकुंजला नेण्यात आलं, तिथे त्यांच्या कुटुंबियांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यानंतर दुपारी अडीच वाजता दीदींचे पार्थिव दादार येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये नेण्यासाठी सुरुवात झाली.

देशभरातील मान्यवरांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्प अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांनीही दीदींना श्रद्धांजली वाहिली, मात्र काही लोक शाहरुखच्या श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

शाहरुखने लतादीदींच्या पार्थिवासमोर नमाज पठण करत दीदींसाठी प्रार्थना केली. शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी दोघेही लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र स्टेजवर चढले होते. मॅनेजर पूजा ददलानी हात जोडून तिथे उभी राहिली, तर शाहरुख खानने प्रथम तिथे उभे राहून नमाज पठण केलं, त्यानंतर मास्क खाली सरकवून त्याने खाली वाकून पार्थिवावर फुंकर मारली. यानंतर शाहरुख खान आपली व्यवस्थापक पूजा ददलानीसोबत हात जोडून पार्थिवाची प्रदक्षिणा करून स्टेजवरून खाली उतरला.

शाहरुखच्या या पद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र शाहरुख खानने पार्थिवावर फुंकर घातल्याचं सगळीकडून म्हटलं जातय.

शाहरुख खानने लतादीदींसमोर प्रार्थना करताच अनेकांकडून ये है इंडिया म्हणून त्याचे कौतुक करण्यात आलं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments