Mumbai : शिवाजी पार्कमध्ये तब्बल 36 विहिरी? या विहिरिंच नेमकं काम काय?
शिवाजी पार्क येथे मधोमध कॉंक्रिटचा रस्ता बनवणार अशी चर्चा गेले अनेक दिवस सोशल मीडियावर होत आहे. तसेच यापुढे मैदानाचे भवितव्य काय? खेळाडू कुठे खेळणार आणि खेळताना कोणत्या समस्या उद्भणार ? या आणि असे अनेक प्रश्नांवर चर्चा होत आहे.

Mumbai : मुंबईतील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजेच शिवाजी पार्क येथे मधोमध कॉंक्रिटचा रस्ता बनवणार अशी चर्चा गेले अनेक दिवस सोशल मीडियावर होत आहे. तसेच यापुढे मैदानाचे भवितव्य काय? खेळाडू कुठे खेळणार आणि खेळताना कोणत्या समस्या उद्भणार ? या आणि असे अनेक प्रश्नांवर चर्चा होत आहे. तसेच खरंच आता शिवाजी पार्कच्या मधोमध माती उपसून खडी, दगड टाकायचे काम सुरू आहे त्यामुळे चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
महानगरपालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी ‘काही दिवसांपासून सोशल मिडियावर शिवाजी पार्कच्या मधोमध कॉंक्रिटचा रस्ता बांधला जात असल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे’, असे स्पष्टीकरण दिले आहे. दगड वा खडीवर मातीचा थर टाकण्यात येणार आहे. तसेच हा रस्ता मातीचा असून त्याखाली पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ग्रावेल्स टाकण्यात येणार आहे. अशा प्रकारची व्यवस्था आंतरराष्ट्रीय मैदानांमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी असते.
तसेच perforated pipes चे जाळे रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या धर्तीवर शिवाजी पार्कच्या जमिनीखाली करण्यात येणार आहे. तसेच पार्कमध्ये नव्याने 36 विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. या विहिरीतील पाणी पार्कमधील गवतावर पाणी शिंपडण्यासाठी आणि धूळ उडू नये यासाठी वापरण्यात येणार आहे. पावसाचे पाणी निचरा होऊन विहिरीना पुनश्च मिळवण्यास मदत होईल.
जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी ‘मैदानाच्या दैनंदिन देखभालीसाठी स्वतंत्र कमिटी नेमण्यात येणार आहे, ती कमिटी स्थानिक रहिवाशांची असेल जे पालिकेला मदत करतील आणि या कामाचे आराखडे जी/उत्तर कार्यालयात उपलब्ध आहे’, असे सांगितले.