राजकारण

Shivsena Press Conference : भाजपच्या साडे तीन नेत्यांवर शिवसेनेकडून टाच, हे ‘ते’ नेते तर नव्हे ना?

"मॅच तो होने दो, अभी तो टॉस हि है!" शिवसेनेच्या पत्रकार परिषदेवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं सूचक वक्तव्य

मुंबई : सध्या राजकरणात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. दिवसागणिक भाजप नेते मवीआच्या नेत्यांनी टार्गेट करतायेत. मंगळवारी (15फेब्रुवारी) शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद (Shivsena Press Conference) असेल, असा ललकार शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केला आहे. मंगळवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत नेमकं काय होणार, कुणाचा बँड वाजणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

भाजपच्या साडे तीन नेत्यांचा पर्दाफाश होणार…

रविवारी (13 फेब्रुवारी) शिवसेनेच्या पत्रकार परिषदेवर माहिती देताना राऊत म्हणतात, ‘हमने बहुत बरदाश्त किया…तो बरबाद भी हम ही करेंगे. यावेळी राऊतांनी अनिल देशमुख असलेल्या तुरुंगात भाजपाचे साडेतीन नेते असतील आणि देशमुख बाहेर असतील, असं म्हणत राजकारणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे आता भाजपाचे नेमके साडे तीन नेते कोण असतील, यावर राजकरणात चांगलीच चर्चा रंगली आहे.

“भाजपने मर्यादा ओलांडली” 

शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे खासदार, आमदार, मंत्री, पदाधिकारी हजर असणार आहे. पत्रकार परिषदेत आम्ही बोलू, आम्हाला संपूर्ण देश ऐकेल, असं राऊत म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून शिवसेनेच्या नेत्यांवर तसेच ठाकरे सरकारवर सातत्याने चिखलफेक केला जातोय. त्यामुळे सगळ्या आरोपांवर आम्ही मंगळवारी उत्तर देऊ असं राऊत म्हणाले.

भाजपचे कोणते नेते टार्गेट होण्याची शक्यता?

भाजपच्या साडे तीन नेत्यांवर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) जागी बसण्याची वेळ येईल, असे सांगत राऊतांनी भाजपला गंभीर इशारा दिल्याचे पहायला मिळते. मागील काही दिवसांपसून भाजप नेते किरीट सोमय्या शिवसेनेच्या नेत्यांवर गंभीर आरोप करताना पहायला मिळाले. त्यामुळे शिवसेनेच्या साडेतीन नेत्यांच्या लिस्ट मध्ये किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे नाव असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. भाजप नेते आशिष शेलार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड राऊतांच्या रडारवर असण्याची शक्यता आहे.भाजपच्या साडे तीन नेत्यांवर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) जागी बसण्याची वेळ येईल, असे सांगत राऊतांनी भाजपला गंभीर इशारा दिल्याचे पहायला मिळते. मागील काही दिवसांपसून भाजप नेते किरीट सोमय्या शिवसेनेच्या नेत्यांवर गंभीर आरोप करताना पहायला मिळाले. त्यामुळे शिवसेनेच्या साडेतीन नेत्यांच्या लिस्ट मध्ये किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे नाव असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. दुसरीकडे राणे कुटुंबातील नाव देखील असण्याची शक्यता आहे. वारंवार शिवसेनेवर टीका करण्याचं काम ते करत असल्यामुळे त्यांच्या नावाची शक्यता आहे. नुकतेच मुंबईत भाजप नेते आशिष शेलार विरोधी मुंबई महापौर किशोर पेडणेकर यांची खडाजंगी पहायला मिळाली. त्यामुळे त्यांचेही नाव असू शकते. शिवसेनेवर आरोप करणारे विरोधी पक्षात अनेक नेते आहे, त्यांपैकी कुणाचा नंबर साडे तीन मध्ये लागतो हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

“मॅच तो होने दो, अभी तो टॉस ही है!”

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिवसेनेच्या पत्रकार परिषदेवर माध्यमांशी संवाद साधताना मॅच तो होने दो, अभी तो टॉस हि है.. असे वक्तव्य करत जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments