Student protest : धारावीतील आंदोलनाबाबत पोलिसांची धक्कादायक माहिती
31 जानेवारीला धारावी येथे झालेल्या आंदोलनाची मुंबई पोलिसाकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे

31 जानेवारी रोजी मुंबई, नागपूर, औरंगाबाद व उस्मानाबाद येथे विद्यार्थी अनेक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. मुंबईत तर मोठया प्रमाणात विद्यार्थी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर जमा झाले होते. शाळा आणि कॉलेजचे शिक्षण ऑनलाइन (Online Education) घेतल्यामुळे परीक्षा ऑनलाईनच घ्यावी यासाठी मुंबईतील विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावी येथील घरासमोर आंदोलन केले. या आंदोलनात मुंबई, ठाणे, वसई अशा अनेक ठिकाणाहून विद्यार्थी सहभागी होते.
धारावी येथे झालेल्या आंदोलनाची चौकशी करण्याकज आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. 31 जानेवारीला धारावी येथे झालेल्या आंदोलनाची मुंबई पोलिसाकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे, जी मुलं वसई, विरार, ठाणे या भागातून आली होती त्या मुलांच्या पालकांना माहिती देखील नव्हती की मुलं कुठे जातायत? अस मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. त्यामुळे मुलांवर लक्ष द्यावे अस आव्हान मुंबई पोलिसांनी केलं आहे. मुलांचे सोशल मीडियावरील हालचाली याकडे लक्ष देणे गरजेचे आहे हे काम पालिकांनी करावे. तसेच विध्यार्थ्यांचे 10 वी आणि 12 वीचे महत्वाचे वर्ष असत तर त्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या मेसेजचा बळी पडु नका, आपला अभ्यास व्यवस्थित करा अस आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे
31 तारखेला जे विद्यार्थी जमले होते ते हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरून जमले होते त्यामुळे विकास पाठक यांना धारावी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात सादर देखील करण्यात आलं. पाठक यांना 11 कलमे लावून 4 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.