स्पोर्ट

Shreyas Iyer Stars Again : श्रेयस अय्यरने विराट कोहलीचा विक्रम मोडला

भारतीय गोलंदाज श्रेयस अय्यरने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. भारताने तिसर्‍या आणि शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव 6 गडी राखून 3 सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली.

Shreyas Iyer Stars Again : भारतीय गोलंदाज श्रेयस अय्यरने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. भारताने तिसर्‍या आणि शेवटच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव 6 गडी राखून 3 सामन्यांची मालिका 3-0 ने जिंकली. या मालिकेत श्रीलंकेला फलंदाज श्रेयस अय्यरला बाद करता आले नाही.

श्रेयस अय्यरने भारताला तिसऱ्या सामन्यात नाबाद 73 धावा करत विजयी बनवले. या मालिकेत तीन डावात श्रेयसने 204 धावा केल्या आहेत. तिसऱ्या T20 (भारत विरुद्ध श्रीलंका) मध्ये श्रेयसने नाबाद 73 धावा 45 चेंडूत केल्या. षटकार आणि 9 चौकार मारले. श्रेयस पूर्ण मालिकेत नाबाद राहिला तसेच त्याने 3 मालिकेत अर्धशतक मिळवले.

श्रेयसने तिन्ही सामन्यात केलेली कामगिरी :-

पहिल्या सामन्यात 28 चेंडूत नाबाद 57 धावा
दुसऱ्या सामन्यात 44 चेंडूत नाबाद 74 धावा
तिसऱ्या सामन्यात 45 चेंडूत नाबाद 73 धावा

T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रेयस अय्यरची कामगिरी पाहता, त्याने 32 डावांमध्ये 37च्या सरासरीने 809 धावा केल्या. त्याने 6 अर्धशतक तर नाबाद 74 धावांची सर्वात मोठी खेळी केली आहे. T20मध्ये त्याने एकूण 2 शतके आणि 28 अर्धशतके केली आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments