विद्यापीठ

SSC-HSC Exam : अखेर निकाल लागला – दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईनच होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार अशी माहिती दिली.

31 जानेवारीला मुंबईत विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन केल. परीक्षा ऑनलाईन घ्यावात किंवा परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यावर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार अशी माहिती दिली. परीक्षा दिलेल्या वेळापत्रकारानुसार होणार असेही सांगितले. म्हणजेच दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होणार आणि बारावीची 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार. श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा अंतर्गत दहावीचे मूल्यमापन 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दरम्यान तर बारावीचे 14 ते 3 मार्च दरम्यान होणार आहे. कोरोनामुळे हे संधी हुकली तर अजून एक संधी देण्यात येईल.
तसेच विद्यार्थ्यांचा विचार करून त्यांना दर वेळीपेक्षा या वेळेस थोडा वेळ जास्त देण्यात आला आहे. 70 ते 80 मार्क्सच्या पेपरला अर्धा तास अधिक तर 40 ते 60 मार्क्सच्या पेपरला 15 मिनिटे अधिक देण्यात येतील. परिक्षेसाठी कोरोना लस बंधनकारक नसल्याचे देखील सांगण्यात आले.
ऑनलाईन परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र दिल्यामुळे एवढ्या जास्त प्रमाणात ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेसाठी जेथे विद्यार्थी शिकत होते त्याच शाळेत आणि महाविद्यालयात परीक्षाकेंद्र/उपकेंद्र उभारण्यात येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी प्रवास करावा लागणार. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रचलित पद्धतीनुसार विशेष सवलती देण्यात येणार आहेत. कोरोनामुळे अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्यात आली असल्याने लेखी परीक्षेचे आयोजन 75 टक्के अभ्याक्रमावर करण्यात आलं आहे. शाळेतलेच आणि महाविद्यालयातलेच शिक्षक सुपरवायझर म्हणून असतील अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments