मंत्रालय

मिठी नदीकडे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी फिरवली पाठ

Mithi Nadi Issue : आतापर्यंत ज्या मिठी नदीवर 1150 कोटी खर्च करण्यात आले आहे आणि कामे अर्धवट आहेत त्या मिठी नदीकडे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी पाठ फिरवली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मिठी नदी विकास व संरक्षण प्राधिकरणाकडे दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाकडे मिठी नदी विकास कामे अंतर्गत मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीची माहिती मागितली होती. मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाने अनिल गलगली यांस कळविले की मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरण मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 6 बैठका झाल्या.

तसेच मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरण अंतर्गत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 11 बैठका झाल्या.

अनिल गलगली यांच्या मते अश्या महत्वाच्या प्रकल्पात जोपर्यंत मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांचे लक्ष नसेल तोपर्यंत त्याकडे गांभीर्याने स्थानिक पातळीवर कोणी लक्ष देत नाही. मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांनी सहामाही बैठक घेण्याची आवश्यकता असल्याचे गलगली म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments