क्राईम

Mumbai Attack : 1993 च्या मुंबई हल्लातील गोष्टी समोर येणार, मोस्ट वॉन्टेड मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

मुंबईला दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागले होते. या हल्ल्यात 257 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी झाले होते.

Mumbai Attack : 1993 हे वर्ष मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण याच वर्षी मुंबईला दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागले होते. या हल्ल्यात 257 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी झाले होते. या हल्ल्यासंबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे की, 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू बकर याला यूएईमधून अटक झाली आहे. अशी माहिती भारतीय तपास यंत्रणाकडून आली आहे. यूएई एजन्सींच्या सहकार्याने अबू बकरला अटक झाली आहे.

अबू बकरचे पूर्ण नाव अबू बकर अब्दुल गफूर शेख आहे. मुंबईत 1993ला जो हल्ला करण्यात आला, त्या मागचा मास्टर माईंड कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकर होता. पण त्याला साथ देणारा आणि दाऊदचा अगदी जवळचा म्हणजेच अबू बकर! 1993 च्या स्फोटात अबू बकरने रडक्स सप्लाय केल्याचेही आरोप आहेत. त्यासह आखाती देशांतून सोने, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी करणे अबुचा मुख्य धंदा आहे.

गेले कित्येक दिवस अबू बकरच्या अटकेसाठी अनेक ऑपरेशन केले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार , अटकेपूर्वी तो पाकिस्तान आणि यूएईमध्ये लपल्याची माहिती मिळाली होती. 2019 मध्येही तो यूएईमधूनच पकडला गेला होता, परंतु काही कागदी त्रुटींमुळे UAE अधिकाऱ्यांनी त्याला सोडले होते. पण अखेर तो पुन्हा हाती लागला आहे आणि त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments