स्पोर्ट

Under 19 World Cup 2022 : भारताचा यशस्वी अंडर 19 World Cup चा प्रवास, अंतिम फेरीत प्रवेश

भारताने अंडर नाईन्टिन विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव करत आपले स्थान अंतिम फेरीत निर्माण केले आहे.

भारतीय संघाने अंडर 19 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव केला, त्यानंतर भारताला अंतिम फेरीत स्थान मिळाले आहे. भारताने या स्पर्धेत सलग चौथ्यांदा तर आजवर आठव्यांदा आपले स्थान अंतिम फेरीत गाठले आहे.

कर्णधार यश धुल याने टॉस जिंकून पहिला फलंदाजी घेतली, तेव्हा भारत संघाने 50 षटकांमध्ये 5 बाद 290 धावा केल्या, नंतर ऑस्ट्रेलिया संघाने 41.5 षटकांत 194 धावा केल्या आणि भारत संघ विजयी ठरला. आता येणाऱ्या 5 फेब्रुवारीला भारत संघाची गाठ अंतिम लढीत इंग्लंडशी असणार आहे. अंडर 19 विश्वचषकात सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत जाण्याचा मान भारताने मिळवला आहे.

टीम इंडियाने 2000, 2006, 2008, 2012, 2016, 2018, 2020 आणि या वर्षी अंतिम फेरी गाठली आहे. तर भारताने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये विश्वचषक जिंकला होता. अंडर-19 विश्वचषकात शतक झळकवणारा यश धुल हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने त्याची कामगिरी कर्णधारपदाला साजेशी अशी केली आहे. 110 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकारासह 110 धावा केल्या. तसेच या संपुर्ण सामन्यात आपल्या भारताच्या युवा खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments