स्पोर्ट

टीम इंडियाला फायनलमध्ये नेणारा यश ढूल कोण आहे?

भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा कर्णधार यश ढूल, उपकर्णधार शेख रशीद आणि चार सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.

ICC Under 19 World Cup मध्ये भारतीय टीमने इतिहास रचताना चौथ्यांदा फायनलमध्ये जागा बनवली आहे. भारतीय टीम अंडर 19 वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये अशी टीम बनली आहे, जी सलग 4 वेळा फायनलमध्ये पोहोचली आहे. कर्णधार यश ढूलेने सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 110 धावांची खेळी केली आणि संगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

सामान्यानंतर त्याने टीमबद्दल नवी गोष्ट सांगितली. कठीण परिस्थितितून बाहेर येण्यासाठी त्याने उपकर्णधार शेख रशीदसह संपूर्ण टीमचे केलेले नियोजन कामी आलं.

फक्त स्पर्धेमधील संघाविरुद्ध भारतीय संघाचा सामना सुरु नव्हता, तर मैदानाच्या बाहेर कोरोनासोबतही अनेक खेळाडू सामना खेळत होते. भारतीय संघातील अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती, मात्र त्यावरही मात करत टीम मॅनेजमेंटमुळे भारतीय संघ यशापर्यंत पोहचू शकला.

भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा कर्णधार यश ढूल, उपकर्णधार शेख रशीद आणि चार सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे संघाला अनेक संकटातून जावं लागलं होतं. ढूल आणि रशीद व्यतिरिक्त, फलंदाज आराध्या यादव, वासू वत्स, मानव पारख आणि सिद्धार्थ यादव यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे भारतीय संघात फक्त 11 खेळाडूच उरले होते, जे आयर्लंडविरुद्ध खेळू शकले.

कोण आहे यश ढूल?

यश हा नवी दिल्लीच्या जनकपुरीचा रहिवाशी आहे. वयाच्या 11 व्या वर्षी यशचा क्रिकेट प्रवास सुरू झाला. सुरुवातीला मुख्याध्यापकांनी क्रिकेट खेळायला परवानगी दिली नव्हती, मात्र हळू हळू स्वत:च्या कामगिरीमुळे मिळवलेलं उज्वल यशाच्या जोरावर त्याने आपलं क्रिकेटमधील स्थान प्रबळ केलं.

त्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजेश नागर सांगतात, “संधी मिळवण्यासाठी यशने खूप प्रयत्न केले होते. त्याला स्वतःला सिद्ध करायला खूप कमी संधी मिळाल्या, मात्र त्यातून त्याने भरारी घेतली. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याला फक्त एकच संधी दिली होती, त्यात त्याने अंडर-14 संघातून खेळताना पहिल्याच सामन्यात नाबाद 125 धावांची खेळी केली होती, तिथून पुढे त्याचा प्रवास सुरु झाला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments