अर्थकारण

Union Budget : आर्थिक बजेट म्हणजे नक्की काय? ही माहिती कधी वाचली नसेल?

अर्थसंकल्प हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 112 अन्व्यये जाहीर केला जातो. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सादर केला जातो, पण मोदी सरकारच्या काळापासून बजेट फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला सादर करण्याची परंपरा सुरू झाली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी, 1 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला.अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचे आर्थिक समायोजन असते. ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात, त्यास साध्या भाषेत अर्थसंकल्प असे म्हणतात.

जेव्हा भारत स्वतंत्र झाला, म्हणजेच 1947 मध्ये भारताचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला गेला. आर. के. शन्मुखम चेट्टी यांनी 26, नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजेच 2019 मध्ये निर्मला सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून आज चौथ्यांदा बजेट सादर केलं.

अर्थसंकल्प हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 112 अन्व्यये जाहीर केला जातो. म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सादर केला जातो, पण मोदी सरकारच्या काळापासून बजेट फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला सादर करण्याची परंपरा सुरू झाली.

सरकारचा कालावधी संपत आला की आर्थिक बजेट सादर करण्यात येते. 2019 मध्ये मोदी सरकराचे अंतरिम बजेट पियुष गोयल यांनी सादर केले होते. 2001 साली भाजपचे सरकार असताना माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हांनी जुनी ब्रिटिशकालीन संध्याकाळी 5.00 वाजता बजेट सादर करण्याची प्रथा बदलून सकाळी 11.00 वाजता बजेट मांडण्याची प्रथा सुरु केली होती. अर्थसंकल्पाचे कागदपत्र हे अर्थमंत्रालयाच्या प्रेसमध्ये छापले जातात. मात्र मागील काही वर्षांपासून Digital India मुळे Digital पद्धतीने बजेट सादर केलं जातय.

बजेट संसदेमध्ये मांडण्याच्या एक आठवडा अगोदर त्याचे प्रिंटींग पूर्ण होते. यामध्ये असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी एका आठवड्यासाठी दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉक मध्येच असतात. त्यांना कोणालाही भेटता येत नाही. यासाठी प्रिंटींगच्या अगोदर “हलवा” हा गोड पदार्थ बनवून सर्वांना वाटला जातो. यंदा मात्र हा कार्यक्रम झाला नाही.

90 च्या दशकापासून बजेटचे किस्से –

  • 1958-59 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु
  • यशवंत सिन्हा यांनी 1991-92 आणि 1998-99 साठीचा अर्थसंकल्प मांडला. 1991-92 मध्ये अंतिम आणि अंतरिम बजेट वेगवेगळ्या पक्षांच्या दोन अर्थमंत्र्यांनी सादर केला.
  • सर्वात जास्त 10 वेळा बजेट सादर करण्याचा मान मोरारजी देसाई यांनी मिळालाय. 1964-68 सालच्या लीप ईयर अर्थात 29 फेब्रुवारी रोजी बजेट मांडला. विशेष म्हणजे त्याच दिवशी त्यांचा वाढदिवस होता.
  • 2014-15 चे बजेट अरुण जेठली यांनी मांडले होते, मात्र मे महिन्यात मोदी शासन निवडून आल्यामुळे ते पूर्ण वर्षाचे बजेट नव्हते. त्यामुळे 2015-16 साठीचे बजेट हे मोदी सरकारचे पहिले पूर्ण वर्षाचे बजेट होते.
  • 2019 साली अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या. यंदा म्हणजेच 2022 मध्ये त्यांनी त्यांचा चौथा अर्थसंकल्प सादर केला.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments