विद्यापीठ

मराठी शाळांमध्ये मुलं येण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

मुंबईसह राज्यातील शाळा सुरु झाल्या. पण, म्हणावा तितका प्रतिसाद पालक आणि विद्यार्थ्यांकडून मिळत नाही. म्हणून वरळी येथील शिक्षकांनी मूल शाळेत यावी यासाठी शक्कल लढवली आणि शाळेचं रुप बदललं आहे.

Marathi Medium Schools : वरळी येथील बीडीडी येथील मराठी शाळा आपलं रूप बदलत आहे. इतर शाळांप्रमाचेच या शाळेला देखील कमी विद्यार्थी संख्येचा प्रश्न सतावत होता. मात्र, या समस्येवर या शाळेतल्या शिक्षकांनी व व्यवस्थापकांनी तोडगा काढला आहे. या शाळेत मुल शाळेत येताना मिकी माऊस, छोटा भीम आणि इतर कार्टून अवतरले आहेत. या कार्टूनला पाहण्यासाठी अनेक लहान मुलं शाळेकडे आकर्षित होत आहेत.

शाळेत केवळ स्वागतच नाही तर विद्यार्थ्यांना स्वतंत्र प्रयोगशाळा, स्वतंत्र वाचनालय देखीव करण्यात आलं आहे. मुलांचं अभ्यासात मन लागावं त्यांना लगेच पालकांची आठवण येऊ नये म्हणून मुलांच्या वयोमानानुसार आम्ही शाळेच्या भिंती रंगवल्या आहेत. एकाच छताखाली मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने आम्ही हे नियोजन केलं आहे. मुले आकर्षित व्हावी यासाठी छोटा भीम, डोरेमॉन अशी चित्र रेखाटली आहेत.

मुंबईत अनेक मराठी शाळा आहेत या शाळांमध्ये मुलांचा टक्का कमी होत असताना करोनाच्या महामारीमुळे शाळा बंद होत्या, शाळा पुन्हा सुरू झाल्या पण मुलांची संख्या शाळेत कमी असल्याने मुलांनी आवडीने शाळेत यावे यासाठी शिक्षकांनी अनोखी शक्कल लढवली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments