फेमस

Video : लता मंगेशकरांच्या ‘या’ भावूक पंक्ती होतायेत व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून त्या ICU मध्ये होत्या, मात्र तब्येत नाजूक असल्याने त्यांना पुन्हा व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलंय.

भारताची स्वररत्न गाणकोकीळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar Health Update) यांना व्हेंटिलेटरवर उपचार सुरु आहेत. लतादीदींना 8 जनवरी रोजी मुंबईच्या ब्रिच कँडी रुग्नालयात दाखल केलं होतं, गेल्या काही दिवसांपासून त्या ICU मध्ये होत्या, मात्र तब्येत नाजूक असल्याने त्यांना पुन्हा व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलंय.

लता दीदी या 92 वर्षांच्या आहेत. वयोमानासोबतच त्यांना इतर व्याधी असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलंय. याच्यातच त्या लवकर बऱ्या व्हाव्यात म्हणून संपूर्ण देशातून त्यांच्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

लता मंगेशकर यांचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ANI ला विशेष माहिती दिली आहे. 5 फेब्रवारी रोजी दुपारी पुन्हा लतादीदींची तब्येत खराब झाल्याने त्यांना दुपारच्या सुमारास व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं आहे. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. तिथून पुढे त्या रुग्णालयात दाखल आहेत.

70 वर्षांच्या करिअरमध्ये लतादीदींनी 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. लतादीदींना सर्वोच्च भारतीय नागरिक पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलय. भारत रत्न, पद्म भूषण, पद्मविभूषण, दादा साहेब फाळके पुरस्कारांसारख्या सर्वोच्च पुरस्काराने लतादीदींना सन्मानित करण्यात आलं आहे.

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी लतादीदींनी 1 जानेवारी 2022 रोजी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये लतादीदींनी काही काव्यपंक्ती म्हटल्या आहेत. त्या काव्यपंक्ती लतादीदींचे वडील दिनानाथ मंगेशकर यांच्या संबंधित आहेत. त्यामध्ये हमे अकेला छोडके चले गये, या पंक्तींनी सुरुवात केली आहे.

पाहा संपूर्ण व्हिडीओ :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments