Vijayshree Natya Spardha: अलिबागमध्ये रंगणार राज्यस्तरीय अभिनय स्पर्धा
रसिक प्रेक्षक, स्पर्धकांचे प्रेम आणि आशिर्वादावर, अलिबागच्या सांस्कृतिक इतिहासातील सातत्याने सुरु असलेली एकमेव अभिनय स्पर्धा म्हणजे विजयश्री. गेली चार वर्ष विजयश्री ही स्पर्धा फ्रायडेफिल्म्स प्रॉडक्शन, अलिबाग यांच्यातर्फे आयोजित केली जाते.

Vijayshree Natya Spardha : रसिक प्रेक्षक, स्पर्धकांचे प्रेम आणि आशिर्वादावर, अलिबागच्या सांस्कृतिक इतिहासातील सातत्याने सुरु असलेली एकमेव अभिनय स्पर्धा म्हणजे विजयश्री. ज्येष्ठ नाट्यलेखक व दिग्दर्शक कै. विजय बारसे यांना अभिवादन म्हणून गेली चार वर्ष विजयश्री ही स्पर्धा फ्रायडेफिल्म्स प्रॉडक्शन, अलिबाग यांच्यातर्फे आयोजित केली जाते.
या स्पर्धेचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही 20 फेब्रुवारी रोजी म्हणजे कै.विजय बारसे यांच्या स्मृतीदिनी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दिनांक 20 फेब्रुवारी 2022 (रविवार) रोजी सायंकाळी अलिबाग येथे संपन्न होणार आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी आपल्या सदरीकरणाचे व्हिडीओ (एडिट न करता) 9762260971 (विवेक), 7038557742 (आश्रिता) या व्हॉट्सॲप किंवा [email protected] या मेल आयडीवर दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.00 पर्यंत पाठवायची विनंती संयोजकांकडून केली आहे.
स्पर्धकांनी प्रवेश, व्हिडीओ व अधिक माहितीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन फ्रायडेफिल्मस् प्रॉडक्शन यांनी केले आहे. अभिनयाची आवड असणाऱ्या अलिबागकर कलाप्रेमी, नाट्य रसिकांनी या स्पर्धेसाठी सहकार्य करून आयोजकांचा आणि स्पर्धकांचाही उत्साह वाढवावा, असे आवाहन केले आहे.
निवड झालेल्या स्पर्धकांची यादी शुक्रवार, दि.18 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वा. फ्रायडेफिल्मस् प्रॉडक्शन (Fridayfilms Production) या फेसबुक पेजवर जाहीर केली जाईल, असे फ्रायडेफिल्मस् प्रॉडक्शनचे संचालक किरण साष्टे यांनी कळविले आहे.