लोकल

‘या’ तारखेपासून मुंबईमध्ये वॉटर टॅक्सी सुरु; पाहा A to Z इम्फॉर्मेशन

मुंबईत येत्या 17 फेब्रुवारीपासून वॉटर टॅक्सी धावणार आहे. मुंबईमध्ये हा पहिला प्रयोग आहे. त्यामुळे याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला पाहणं गरजेचं आहे.

Water Taxi Mumbai : मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानची कनेक्टिव्हिटी असलेल्या बहुप्रतिक्षित मुंबई वॉटर टॅक्सी सेवा सुरु होत आहे. 17 फेब्रुवारी रोजी केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन होणार आहे. तीन दशकांपूर्वी वॉटर टॅक्सीचे नियोजन करण्यात आले होते. केंद्राच्या अंतर्देशीय जलमार्ग उपक्रमाचा एक भाग म्हणून गेल्या काही वर्षांपासून याचं काम सुरु करण्यात आलं होतं. मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड (एमएमबी) आणि सिडको या एक केंद्रीय आणि दोन राज्य संस्थांनी या प्रकल्पावर एकत्र काम केले आहे. यामुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाचा वेळ मोठ्याप्रमाणात वाचणार आहे.

कोणते मार्ग असतील?

वॉटर टॅक्सीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉटर टॅक्सीच्या उद्घाटनासाठी आतापर्यंत तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

1. दक्षिण मुंबईतील देशांतर्गत क्रूझ टर्मिनल आणि नवी मुंबईतील बेलापूर दरम्यानचा पहिला मार्ग आहे.

2. बेलापूर ते एलिफंटा लेणी दरम्यान दुसरा मार्ग असणार आहे.

3. बेलापूर ते जेएनपीटी (जवाहरलाल नेहरू बंदर) दरम्यानचा तिसरा मार्ग असणार आहे.

चार ऑपरेटर्सकडून सेवा

एकूण चार ऑपरेटर सेवा चालवतील आणि मोठ्या वाहतुकीसाठी वॉटर टॅक्सी आणि कॅटामरन्ससाठी स्पीड बोट वापरता येईल. तिकीटांबाबत बोलायचं झाल्यास डीसीटी ते बेलापूर दरम्यान 290 रुपये एका प्रवासाचं भाडं असू शकतं. आणि त्याच मार्गासाठी 12,000 रुपये मासिक पास देखील आहे. कॅटामरन्स 40-50 मिनिटांमध्ये आपला आरामदायी प्रवास पूर्ण होऊ शकतो. याशिवाय बेलापूर ते एलिफंटा यांच्यामध्ये जाणे आणि येणे असे मिळून 825 रुपये असू शकते.

वॉटर टॅक्सीमुळे नवी मुंबईहून जेएनपीटी, दक्षिण मुंबई, एलिफंटा ही महत्त्वाची ठिकाणे जोडली जाणार आहेत. अशामुळे वाहतूकही वाढेल आणि नागरिकांना आरामदायी प्रवासही करता येणार आहे.

वॉटर टॅक्सीही अतिमुसळधार पावसाच्या वेळेस बंद केली जाईल, तशाप्रकारची माहिती प्रवाशांना दिली जाईल, मात्र इतर महिने ही सेवा सुरु असते.

या टॅक्सीच्या वेळापत्रकाबाबतही अधिकृत माहिती समोर  येणे बाकी आहे. मात्र नागरिकांच्या कामाच्या वेळेमध्येच या टॅक्सी चालवल्या जातील, अशी माहितीही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments