राजकारण

कोरोनाने मृत्यू; पण अनुदान कागदावरच, शासनाकडून नातेवाईकांची थट्टा?

कोरोना बळींच्या नातेवाईकांना 50 हजार सानुग्रह अनुदान देण्याची योजना ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेने केवळ कागदावरच दाखवली आहे.

Funding to Covid Death : कोरोना बळींच्या नातेवाईकांना 50 हजार सानुग्रह अनुदान देण्याची योजना ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेने केवळ कागदावरच दाखवली, परंतु प्रत्यक्षात नातेवाईकांच्या खात्यात रक्कम जमा झालीच नाही हा निव्वळ निलाजरेपणाचा कारभार असल्याची टीका मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

राज्य शासनाने कोरोना बळींच्या नातेवाईकांस 50 हजार रुपये सानुग्रह मदत करण्याची घोषणा केली, तसेच मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणार असल्याचे ही शासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात तसे न झाल्यामुळे ही योजना नातेवाईकांसाठी क्रूर थट्टा ठरली असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे.

कोरोना बळींच्या नातेवाईकांच्या खात्यात तातडीने रक्कम जमा करण्यात यावी तसेच नातेवाईकांना मनस्ताप झाल्याबद्दल आणि त्यांची फसवणूक केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिका आयुक्त यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागावी अशी मागणी ही अतुल भातखळकर यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने संपूर्ण देशात योजना राबविली होती की, कोरोनामुळे मृत पावलेल्या नातेवाईकांना मदत देण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 35 हजार 138 प्राप्त झाली आहेत. यापैकी 20 हजार 462 नियमात बसली आहेत तर काही 21हजार 472 पत्र अदखलपत्र झाले आहेत. 715 पत्रांची प्रक्रिया सुरू आहे. पालिकेवर आरोप केले जातायत की मदत दिली जात नाही हे चुकीच आहे. आम्ही भायखळा येथील पेंग्विण हॉलमध्ये तक्रार निवारण्यासाठी मी स्वतः हजर राहणार आहे तर ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनी कागदपत्रे घेऊन यावे अशी विनंती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments