सुशांतला मारायला आलेल्या माणसांमध्ये लालदिव्याची गाडी कोणाची? राणेंचा कोणाला इशारा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूर प्रकरणावर भाष्य करून एक खळबळजणक खुलासा केला आहे.

Sushant Singh Rajput Case update : शिवसेना नेते संजय राऊत, भाजप नेते किरीट सोमय्या, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदा गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ऐकत असाल. यामध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, ईडी आणि सीबीआय अशा गोष्टींचा वारंवार उल्लेख होताना दिसत आहे. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूर प्रकरणावर भाष्य करून एक खळबळजणक खुलासा केला आहे. (Who is Sushant Singh Rajput)
आधी प्रकरण सुरुवातीपासून पाहूया.
काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी महापत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अनेक भाजप नेत्यांवर आरोप केले. त्याला उत्तर म्हणून भाजप नेते किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर लगेचच भाजप नेते नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली. याला उत्तर म्हणून पुन्हा शिवसेनेकडून विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. (Where is Sushant Singh Rajput Home)
या सगळ्यात बीएमसीही मागे राहिली नाही. तर बीएमसीकडून नारायण राणे यांच्या मुंबईतील घराला नोटीस पाठवण्यात आली. यामध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्यामुळे ही नोटीस असल्याचं म्हटलं जात आहे, मात्र बीएमसीकडून आलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. आज म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी सकाळच्या दरम्यान ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आपल्या इमारतीला आलेल्या नोटीसीबद्दल राणेंनी माहिती दिली. मात्र पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर राणेंनी एक धक्कादायक विधान केलं. (Is Sushant Singh Rajput IIT?)
राणेंनी काय म्हटलं?
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली. यावर वादविवाद अजूनही सुरुच आहे. मुंबई पोलिसांसह केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासातून सुशांत सिंहने आत्तहत्या केल्याचं समोर आलंय. मात्र आता नारायण राणे यांनी मात्र त्याची हत्या झाल्याचं म्हटलं आहे. (When Sushant Singh Rajput died?)
दिशा सालियान हिच्यावर आत्याचार करण्यात आले होते. दिशा सालियान ही सुशांतसिंह राजपूतची असिस्टंट होती. सुशांतच्या आत्महत्येच्या एक महिना आधी इमारतीवरून पडून दिशाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. तिच्याबरोबर नेमकं काय झालं होतं, हे सुशांतला माहिती होतं म्हणून सुशांतचा खूण करण्यात आला. त्याला मारण्यास आलेल्या ताब्यामध्ये एक लालदिव्याची गाडीही होती, असा आरोप नारायण राणे यांनी लावला आहे. यामुळे खरच सुशांतसिंह राजपूत याची हत्या झालेय का की त्याने आत्महत्या केलेय, यावर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.