फेमस

ज्याच्या कार्यकर्त्याने बलात्कार केला, त्याच डॉनला राखी बांधणारी गंगुबाई फेमस का झाली?

500 रूपयांसाठी प्रियकर नवऱ्याने कोठ्यावर विकलं आणि दहशत माजवणाऱ्या गंगुबाईचा जन्म झाला.

Gangubai Kathiawadi : आता तुम्हाला वाटेल की मधल्या मध्ये गंगुबाई काठियावाडीचा काय संबंध, तर संबंध सांगण्यासाठी आम्हाला आलिया भटची मदत घ्यावी लागत आहे, कारण आलिया भट्टचा ‘गंगुबाई कठियावाडी’ नावाचा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येतोय. ट्रेरल येताच त्याची सर्वत्र चर्चा सुरु झालीये. चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत आहे. तर सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आाहे. चित्रपटाचा ट्रैलर पाहिल्यानंतर तुमच्या मनात ‘गंगुबाई कठियावाडी’ कोण आहे, हा प्रश्न नक्की येणार, म्हणून त्याचं उत्तर देण्याचं काम काही प्रमाणात आम्ही करत आहोत.

16 वर्षांपूर्वी मुंबईत एक पूस्तक आलं होतं, एस. हुसैन झैदी यांनी त्याचं लिखान केलं होतं, ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ असं या पुस्तकाचं नाव होतं. या पुस्तकाचा आधार घेऊन संबंधित चित्रपट बनवला आहे.

गंगुबाई ही गुजरातमधील हरजीवनदा काठियावाडची रहिवाशी असते. तिचे खरे नाव हरजीवनदास काठियावाडी असं होतं, पण कोठ्यावर रवानगी झाल्यानंतर तिचं नाव गंगुबाई ठेवण्यात येतं. तिला करिअरच्या सुरुवातीला हिरोइन बनायचे स्वप्न होते. मात्र वयाच्या 16 व्या वर्षी ती तिच्या वडिलांच्या अकाउंटेंटच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत ती मुंबईमध्ये आली.

ज्याच्यासोबत प्रेम झालं, ते प्रेम इतकं वेडं होतं की घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने त्याच्याशी लग्न केलं, त्यानंतर तो दारुडा असल्याचं समजलं, त्यामुळे त्याने पैशांसाठी बायकोला विकण्याचा प्रयत्न केला. लग्नानंतर ते दोघे मुंबईला पळून आले, पण गंगुबाईने स्वप्नातही विचार केला नव्हता की तिच्यासोबत काहीतरी वेगळं होणार होतं. गंगुबाईने ज्या व्यक्तिच्या प्रेमापोटी तिचे कुटुंब सोडले त्यानेच तिचा विश्वासघात केला. गंगुबाईच्या पतीने तिची फसवणुक करुन तिला अवघ्या 500 रुपयांना एका कोठ्यावर विकले. (Who was gangubai Kathiawadi in real-life)

माफिया डॉनची भेट

कोठ्यावर आल्यानंतर हरजीवनदासची गंगुबाई कठियावाडी म्हणून ओळख झाली. माफिया डॉन करीम लालाच्या टोळीतील एका सदस्याने गंगुबाईवर बलात्कार केला होता. यानंतर गंगूबाईने करीम लालाची भेट घेऊन न्याय मागितला. एवढेच नव्हे तर तिने चक्क करीम लालाला राखी बांधुन भाऊ बनवलं. यानंतर पतिच्या फसवणूकीला आणि समाजाच्या दुरावस्थला बळी पडलेल्या गंगुबाईने नवा प्रवास सुरु केला. (Is gangubai Kathiawadi a real story)

गंगुबाई मुंबईच्या कामाठीपुरा रेड लाइट्स परिसरात अनेक कोठे चालवत होती. कोणत्याही मुलीच्या समंतीशिवाय गंगुबाई तिला आपल्या खोलित ठेवत नसे, असं अनेकजण म्हणतात. आपल्यावर झालेला अन्याय दुसऱ्यांवर होऊ नये, म्हणून तिने हा निर्णय घेतला होता. अशा अनेक मुली कोठ्यावर होत्या, ज्यांची फसवणूक झाली होती, त्यांना मुलंही झाली होती, गंगुबाईने त्या सगळ्यांच्या हक्कासाठी लढण्याचा निर्णय घेतला. (Is gangubai real)

करीम लालाच्या मदतीने तिने अनेक मोठी कामं केली, आपल्या प्रमाणे ज्या महिलांवर अन्याय झाला, त्यांच्या हक्कासाठी लढण्यासाठी गंगुबाई राजकारणात आली, गंगुबाईच्या आधी जे लोक कामाठीपुरा चालवायचे, त्यांच्या नाकावर टिच्चून गंगुबाई फेमस होते आणि कोठ्यावर आपलं राज्य गाजवते. (Where watch gangubai Kathiawadi online)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments