आपलं शहर

‘छत्रपती शिवाजी पार्क’ एवढं फेमस का; नेमकी क्रेझ कुठून सुरू झाली?

पार्कवर घडलेले राजकारणातील किस्से , स्वातंत्र्यरणसंग्राम , क्रीडाक्षेत्राबद्दल प्रेम अनेक लोकांना प्रेरित करतात आणि छत्रपति शिवाजी महाराज पार्कच्या प्रेमात पडायला भाग पाडतात.

दादर म्हणजेच मुंबईतील दाट वस्तीचे, सुप्रसिद्ध असे सदा रहदारीचे आणि देशातील सर्वात महागड्या ठिकाणांपैकी एक ठिकाण! ज्याच्या मनात मुंबईबद्दल विशेष आकर्षण आहे, त्याला दादर नक्कीच माहिती असेल आणि मुंबईकरांसाठी खास करून मुंबई उपनगरीय लोकलमधील मध्य मार्ग आणि पच्छिम मार्गावरील नागरिकांसाठी दादर म्हणजे जिव्हाळाच! दादर मध्ये खूप काही पाहण्यासारखे आहे आणि नसेल हि कसे? मुंबईच्या मधोमध स्थित असलेले ‘दादर’ एक एतिहासिक शहर जे आहे. मुंबई दर्शन करण्यास येणाऱ्या नागरिकांमध्ये दादर स्थित असलेल्या ‘छञपती शिवाजी महाराज पार्क ‘ विषयी एक वेगळेच आकर्षण आहे. इतकेच नव्हे तर ‘ छञपती शिवाजी महाराज पार्क’ मुंबईतील सर्वात मोठे सार्वजनिक पार्क आहे. 28 एकर परिसरात हे भले मोठे पार्क पसरले आहे. मुंबईकरांच्या हृदयात या पार्कबद्दल खूप अभिमान आहे. याचे कारण म्हणजेच या पार्कचा भला-मोठा इतिहास ! ( Why Chhatrapati Shivaji Park is so famous; Where exactly did the craze start? )

2020 साली शिवाजी पार्कचे नाव बदलून ‘छञपती शिवाजी महाराज पार्क’ ठेवण्यात आले. याच मैदानातून अनेक भारतीय क्रिकेटपटू तयार झाले. याच मैदानातून भारताला आणि खासकरून महाराष्ट्राला मराठी स्वाभिमानासाठी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी मराठी माणसाच्या जीवाभावांची माणसं मिळाली. भारतासाठी क्रिकेट खेळणारे मुंबईकर खेळाडू मुख्यतः याच पार्कच्या मातीतून तयार झाले. विशेष म्हणजे येथे क्रिकेटसह, फुटबॉल, टेनिस तसेच मल्लखांबचे ट्रेनिंग्सदेखील एकाच वेळी सुरू असतात. ‘छत्रपति शिवाजी महाराज पार्क’ जरी पार्क असले तरीही या पार्कवर प्रेम वृद्धही तितकेच करतात जितके लहान व किशोरवयीन मुले ! याचे कारण म्हणजेच या ठिकाणी असलेले वातावरण, लोकांची गजबज, अंगावर शहारे देऊन मराठी अस्मितेची जाणीव करून देणारा छत्रपतींचा विशाल पुतळा आणि भक्तीत दंग होण्यासाठी गणेश मंदिरातील मृदुंग-तालांचा मन मोहक आवाज!

स्वातंत्र्यलढ्यामध्ये शिवाजी पार्कचा प्रामुख्याचा वाटा आहे. स्वातंत्र्यकारकांनी याच मैदानात ब्रिटिश सर्जरविरुद्ध अनेक आंदोलने आणि चळवळ्या केल्या. हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची पहिली सभा छञपती शिवाजी महाराज पार्कमध्येच घेतली. आजही छ्त्रपती शिवाजी महाराज पार्कवर गेल्यानंतर अनेकांचे कान ‘जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो…’ हे शब्द ऐकण्यासाठी तळमळतात. दरवर्षी विजय दशमीच्या दिवशी घेण्यात येणारे शिवसेनेचे ‘ दसरा मेळावे’ याच मैदानावर पार पडतात. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक भाषणे याच मैदानावर घेण्यात आले आहेत. या मैदानावर दरवर्षी कोणत्या ना कोणत्या राजकीय हालचाली घडतच असतात.

मुंबई महाराष्ट्रात येण्यासाठी आणि मराठी भाषिकांसाठी स्वतःचे असे राज्य मिळवण्यासाठी ‘ संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ करण्यात आली. ही चळवळ देखील छञपती शिवाजी महाराज पार्कमध्येच आकारण्यात आली होती. 1 मे 1960 रोजी चळवळीला यश प्राप्त झाले आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीचे दोन भाग करण्यात आले. जो भाग मराठी माणसांना मिळाला तो म्हणजे ‘महाराष्ट्र!’ 105 मराठी जणांच्या शहिदाने, महाराष्ट्राने मुंबई जिंकली. मुंबई फक्त शहर नाही तर त्या 105 वीरांचे यश आहे आणि अवघ्या मराठी मुल्काचे प्राण आहे.

भारताचा अभिमान आणि क्रिकेटचा देव म्हणून संबोधला जाणारा भारतरत्न सचिन रमेश तेंडूलकर, एक क्रिकेटपटू म्हणून याच मैदानात तयार झाला. त्यासोबत भारतीय क्रिकेटला शिखरावर पोहचवणारे अजित वाडेकर, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील आणि अजित वाडकर भारतीय संघात क्रिकेटर म्हणून याच मातीत परिपक्व झाले. आज भारतीय क्रिकेटने जे शिखर गाठले आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराज पार्कने तयार केलेल्या या दिग्गजांचा वाटा फार मोठा आहे.

छ्त्रपती शिवाजी महाराज पार्कच्या आजूबाजूचा परिसर जरी अतिउच्चवर्गांय लोकांचा असला तरी मुंबईतील प्रत्येक माणसाची नाळ या मातीशी जोडली गेली आहे. या पार्कवर घडलेले राजकारणातील किस्से , स्वातंत्र्यरणसंग्राम , क्रीडाक्षेत्राबद्दल प्रेम अनेक लोकांना प्रेरित करतात आणि छत्रपति शिवाजी महाराज पार्कच्या प्रेमात पडायला भाग पाडतात.

हे हि वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments