घटना

मुंबईत अचाकन नेटवर्क का गेलं? महत्त्वाचं कारण आलं समोर

मुंबईमध्ये सध्या तुम्ही फोनवर बोलत असताना अचानक तुमचा फोन कट होत असेल, अचानक तुमचे इंटरनेट जात असेल

Network Issue Mumbai : मुंबईमध्ये सध्या तुम्ही फोनवर बोलत असताना अचानक तुमचा फोन कट होत असेल, अचानक तुमचे इंटरनेट जात असेल, किंवा अचानक तुमच्या समोरच्या पार्टीचा अवाज अस्पष्ट येत असेल, हा प्रकार फक्त तुमच्यासोबत नाही, तर मुंबईतल्या अनेक सामान्य नागरिकांसोबत होत आहे. आता हा त्रास का होत आहे, हे एकदा समजून घ्या. (Is internet down in Mumbai today?)

मुंबईत जिथे जिथे उड्डाणपूल आहेत, तिथे तिथे नेटवर्कचे टॉवर उभारलेली असतात. ही यंत्रणा चालू ठेवण्यासाठी ‘सुयोग टेलीमॅटिक्स’ ही कंपनी काम करते, मात्र या कंपनीने रस्त्यांच्या उड्डाणपुलांवर लावण्यात आलेल्या यंत्रणांचा कर भरला नाही. तो कर रस्ते विकास महामंडळाकडे जमा करावा लागतो. मात्र हा कर न भरल्याने एमएसआरडीएने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. (Vodafone users in Mumbai are facing network issue)

31 डिसेंबर रोजी हा करार संपला होता, मात्र आतापर्यंत या करारातील रक्कम सेल्यूलर ऑपरेटर्स कंपनीच्या थर्ड पार्टीने एमएसआरडीएकडे जमा केला नाही. रस्त्यांच्या उड्डाणपुलांवर नेटवर्कची यंत्रणा उभारण्यासाठी ‘सुयोग टेलीमॅटिक्स’कडून एमएसआरडीएला भाडेतत्वावर रक्कम दिली जाते, मात्र ही रक्कम ‘सुयोग टेलीमॅटिक्स’कडून थकवण्यात आली. त्यामुळे एमएसआरडीने नेटवर्कच्या संबंधित सर्व साहित्य आपल्याकडे जमा केलं आहे. (Airtel India Outage in Mumbai Suburban)

जमा केलेले साहित्य संबंधित कंपन्यांना देण्यासही एमएसआरडीने नकार दिला आहे. त्यामुळे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्स असोशिएशनने थेट मुख्यमंत्र्यांना यासंबंधाची दखल घेण्यासाठी पत्र लिहलं आहे. (Reliance Jio Outage in Mumbai)

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईत सध्या 3.5 कोटींहून अधिक नागरिक या उड्डाणपुलांच्या यंत्रणांमधून मिळणारे नेटवर्क वापरत आहेत. मुंबईच्या उड्डाणपुलांवर 300 ते 400 च्या दरम्यान टॉवर्स आहेत, एका टॉवरवर साधारण 4 टेलिकॉम कंपन्यांची यंत्रणा उभी असते, मात्र ही संपूर्ण यंत्रणा एमएसआरडीएने ताब्यात घेण्याचं काम सुरु झाल्याने मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments