Lata mangeshkar : शिवाजी पार्कवर लतादीदींचे स्मारक उभारणार? BJP आमदाराची मागणी
गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादीदी यांचे स्मृतीस्थळ उभारून त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन कराव्यात ही नम्र विनंती मी कोट्यवधी संगीतप्रेमी व लतादीदींचाच्या चाहत्यांच्यावतीने करत आहे.

Lata mangeshkar : तब्बल 28 दिवसांच्या कोरोनाच्या झुंज देत भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्राणजोत आज मावळली. रविवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्या निधनानंतर केंद्राने 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. (Lata mangeshakar death)
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर संपूर्ण देशावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे अस केंद्राने म्हटलं आहे तसेच दिदींचे शिवाजी पार्क येथे स्मृती स्थळ करण्यात यावे अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. (Laga mangeshkar song)

भारतरत्न दिवंगत स्वर्गीय लता दीदी यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे, त्याच जागी शिवाजी पार्कावर गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादीदी यांचे स्मृतीस्थळ उभारून त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन कराव्यात ही नम्र विनंती मी कोट्यवधी संगीतप्रेमी व लतादीदींचाच्या चाहत्यांच्यावतीने करत आहे. अशा आशयाचे पत्र भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहल आहे.
तसेच तातडीने त्यांच्या विनंतीचा भावनेचा सन्मान करावा आणि त्याच ठिकाणी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ बनवावे अशी देखील मागणी कदम यांनी केली आहे.