Aamir Khan Birthday : काजोलची ती गोष्ट शाहरुखला विचारली आणि अमिरला भलतच उत्तर मिळालं…
सर्वांची बॉलीवूडची आवडती जोडी म्हणजे 'शाहरुख खान आणि काजोल'. या जोडीचे अनेक सुपरहिट चित्रपट आहेत. जेव्हा प्रेक्षकांनी शाहरुख आणि काजोलची जोडी 'बाजीगर' चित्रपटात बघितली तेव्हा त्यांना ही जोडी फार आवडली. आणि तेव्हाच आमिर खानला ही केमिस्ट्री आवडली. काजोलचे काम बघून आमिर खानला तिच्यासोबत काम करायचे मन झाले.

Aamir Khan Birthday : सर्वांची बॉलीवूडची आवडती जोडी म्हणजे ‘शाहरुख खान आणि काजोल’. या जोडीचे अनेक सुपरहिट चित्रपट आहेत. जेव्हा प्रेक्षकांनी शाहरुख आणि काजोलची जोडी ‘बाजीगर’ चित्रपटात बघितली तेव्हा त्यांना ही जोडी फार आवडली. आणि तेव्हाच आमिर खानला ही केमिस्ट्री आवडली. काजोलचे काम बघून आमिर खानला तिच्यासोबत काम करायचे मन झाले. तेव्हा आमिर खानने सरळ शाहरुख खानला एका मित्राच्या नात्याने फोन केला.
तेव्हा आमिर खानने शाहरुखला एका सल्ल्यासाठी फोन केला होता. त्याच्या नवीन चित्रपटासाठी नायिकेच्या भूमिकेसाठी तो अभिनेत्री शोधत होता. त्याच दरम्यान त्याने शाहरुख आणि काजोलची जोडी बघितल्यामुळे शाहरुखला काजोलच्या कामाविषयी विचारण्यासाठी फोन केला. बाजीगरमध्ये काम करताना काजोलसोबत काम करताना कसा अनुभव होता? मग तिची काम करण्याची पद्धत कशी आहे? असे प्रश्न विचारले. आमिर खान काजोलसोबत काम करण्यासाठी उत्सुक होता.
याविषयी स्वतः शाहरुख खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘जेव्हा मी काजोलसोबत बाजीगर चित्रपटात काम करत होतो तेव्हा मला आमिर खानने मला फोन केला होता. तो मला काजोलविषयी विचारत होता. तेव्हा मी आमिरला सांगितले, ‘ती खूप वाईट अभिनेत्री आहे. ती नीट लक्ष नाही देत, तू तिच्यासोबत काम करू नाही शकत. पण जेव्हा मला संध्याकाळी त्याच्या चित्रपटाबद्दल समजलं तेव्हा मी लगेच फोन केला. आणि त्याला सांगितले, ‘मला नव्हतं माहिती याबद्दल पण ती तर स्क्रीनवर जादू करून टाकेल.’