फेमस

Aaryan Khan Drugs Case : तो आर्यन खान नव्हेच ! आर्यनला कोर्टकडून दिलासा

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या वर्षीपासून ड्रग्सच्या केसमध्ये अडकला आहे. पण आता त्याला दिलासा मिळाला आहे. एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासाअंती खूप मोठी गोष्ट उघड झाली आहे

Aaryan Khan Drugs Case : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या वर्षीपासून ड्रग्सच्या केसमध्ये अडकला आहे. पण आता त्याला दिलासा मिळाला आहे. एनसीबीने स्थापन केलेल्या विशेष चौकशी समितीच्या तपासाअंती खूप मोठी गोष्ट उघड झाली आहे. कार्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये आर्यन खानकडे कोणतेही अमली पदार्थ नव्हते. तसेच आर्यनचा कोणत्याही मोठ्या रॅकेटशी संबंध नाही असेही त्यांच्या निदर्शनास आले आहे.

अरबाज मर्चंटकडे ड्रग्ज सापडले होते आणि हे ड्रग्ज तो आर्यन खानला देण्यासाठी आला होता, असे एनसीबीने या प्रकरणात म्हटले आहे. आर्यन खान हा आंतरराष्ट्रीय रॅकेटचा भाग होता आणि त्याच रॅकेटकडून हे ड्रग्ज आले होते असादेखील एनसीबीचा दावा आहे. पण हा अहवाल उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. हे प्रकरण मोठं झाल्यामुळे या प्रकरणात एसआयटीला नेमण्यात आले.

तसेच आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हाट्सएप चॅट बघितल्यानंतर त्यात काहीही आक्षेपार्ह नाही आणि त्याचे मित्र अरबाज मर्चंड, मूनमून धमेचा काहीही कट नाही हे स्पष्ट होते. मुंबई उच्च न्यायालयाने असे नोंदविले आहे की, यासंदर्भात एनसीबीने केलेले आरोप निराधार आहेत.

कार्डेलिया क्रूझवर टाकण्यात आलेल्या छाप्यात त्यालादेखील अटक करण्यात आली होती. आता आर्यन खानला या प्रकरणात क्लीनचीट मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्यन खान आणि शाहरुख खानला आता दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments