
Assistant Professor In BMC Hospital : कोरोना काळानंतर आता हळूहळू अनेक सरकारी रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सहायक प्राध्यापक (Assistant Professor) या पदांसाठी एकूण 5 जागा निघाल्या आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
सहायक प्राध्यापक (Assistant Professor) या पदांसाठीच्या 5 जागा या वेगवेगळ्या विभागात आहेत. जसे की, Assistant Professor Neuro Surgery Department (मज्जातंतू शल्य चिकित्साशास्त्र विभाग) या 1 पदासाठी उमेदवाराने Neuro Surgery मध्ये M.Ch. पर्यंत पूर्ण शिक्षण पाहिजेल. Assistant Professor Obst. And Gynae. Department (स्त्रीरोग-प्रसुतिशास्त्र) या 2 पदांसाठी उमेदवाराने Obst. And Gynae. मध्ये M.D. पर्यंत शिक्षण पूर्ण पाहिजेल. Assistant Professor ENT Department (कान-नाक-घसा) यातील 2 पदांसाठी उमेदवाराने Otorhinolaryngology मध्ये M.S.पर्यंत शिक्षण पूर्ण पाहिजेल. हे शिक्षण मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले पाहिजेल. तसेच संबंधित पदाचा किमान 3 वर्षांचा अनुभव असला पाहिजेल. या पदांसाठी 1,00,000 रुपये इतका प्रतिमहिना पगार असेल. मुलाखतीची तारीख 14 व 15 मार्च 2022 आणि वेळ सकाळी 11.30 आहे.
अर्ज 7 मार्च पासून ते 11 मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी 11 ते दुपारी 3.30 पर्यंत मुख्य लिपिक (रोख) यांच्या कडून प्राप्त करु शकतात. तसेच अर्ज देण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2022 संध्याकाळी 4.30 पर्यंत आहे. अर्ज शुल्क रु. 500 + 18% जी.एस.टी. एवढी असेल. या पदांसाठी मुलाखतीचे ठिकाण अधिष्ठाता लो.टी.म.स. रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय डॉ. बाबासाहेब आंबडेकर रोड, शीव, मुंबई 400022 हे आहे. यासंबंधित अधिक माहितीसाठी आणि पुढील सूचनांसाठी www.portal.mcgm.gov.in या त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.