राजकारण

भाजप आमदारांची थेट मुख्यमंत्र्यांना विनंती; 92 आमदारांच्या सहीचं पत्रही दिलं साक्षीला…

विधानसभेतील 92 आमदारांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर, काश्मीर फाईल्स चित्रपट करमुक्त करावा


BJP MLA Writes Letter To CM : काश्‍मीर फाईल्‍स हा चित्रपट महाराष्‍ट्रात करमुक्‍त करण्‍याबाबतच्या मागणीचे  विधानसभेतील 92 आमदारांच्या स्वाक्षरीचे निवेदन विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले

निर्माते आणि दिग्‍दर्शक अभिषेक अग्रवाल आणि श्री. विवेक अग्निहोत्री यांचा काश्‍मीर फाईल्‍स हा चित्रपट सध्‍या चर्चेत आहे. 11 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेल्‍या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांकडूनही दाद मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या चित्रपटाचे विशेष कौतुक केले आहे असे या निवेदनात नमूद केले आहे. क्रौर्य आणि हिंदुंचा आक्रोश यावर आधारीत वास्‍तवाला भिडणारा हा चित्रपट आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापिठात काश्मिरी युवकालाच काश्मिरी पंडितांविरुद्ध उकसवले जाते. अशा विद्यापिठांतून आझादीच्या नावाखाली फुटीरतावादी शक्तींना खतपाणी घातले जाते, हे चित्रपटात ठामपणे मांडण्यात आले आहे. आज काश्मीर जळत आहे, उद्या संपूर्ण भारत जळेल. काश्मिरी हिंदूंना न्याय का मिळत नाही? काश्मीर भारताचा अविभाज्य घटक असतांना तेथे एवढा प्रमाद का घडू दिला? काश्मिरी हिंदू आपल्याच देशात विस्थापित का? काश्मिरी हिंदूंना पुन्हा काश्मीर खोर्‍यात वसवले का जात नाही? काश्मिरी हिंदूंच्या दुःस्थितीला सर्वसामान्य हिंदूही उत्तरदायी आहेत, यांसारखे अनेक संवाद प्रेक्षकांना अंतर्मुख करतात. पात्रांद्वारे पार्श्वभूमीला असलेले संवाद, काश्मिरी गीते या चित्रपटाची धार तीव्र करतात. राष्ट्रवाद व राष्ट्रभक्ती ने ओतप्रोत हा चित्रपट अतिशय प्रभावशाली आहे असे या निवेदनात नमूद केले आहे.

हा चित्रपट कर मुक्त करावा यासाठी भाजपाकडून सभागृहात देखील विषय मांडण्यात आला होता. तसेच भाजपा आमदार राम कदम यांनी देखील आंदोलन करत सरकारचे लक्ष केंद्रित केले होते, त्यामुळे मुख्यमंत्री याकडे कसे पाहतात व कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments