मशिदीच्या भोंग्यावरुन भाजपने वातावरण तापलं, आता संजय पांडेंना केलं अपील…
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे ही विनंती करण्यात आलीये. या विनंतीमध्ये मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले, हे जरा सविस्तर पाहा.

आधी अनेक नागरिकांकडे वेळ समजण्यासाठी घड्याळ नसायचे, त्यामुळे त्यांना आपल्या नमाज पठणाचा वेळ समजण्यास अडचण निर्माण व्हायची. यावर उपाय म्हणून मशिदींवर लाऊड स्पिकर लावले जायचे. मात्र आता अनेकांकडे वेळ समजण्यासाठी काही ना काही साधनं आहे, त्यामुळे आता भोंगे काढावेत, असं आवाहन भाजप नेते मोहित कंबोज यांनी मुंबई पोलिसांना केलंय.
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे ही विनंती करण्यात आलीये. या विनंतीमध्ये मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले, हे जरा सविस्तर पाहा.
संजय पांडे यांनी आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत सुरुवातीला ध्वनी प्रदुषणाच्या बाबतीत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. रात्री 10 नंतर कुठल्याही प्रकारचं बांधकाम होणार नाही, असा आदेश काही दिवसांपुर्वी दिला होता. आता त्याचाच धागा धरुन कंबोज यांनी अजून एक आवाहन केलं आहे.
मुंबईच्या अनेक मशिदींबाहेर काही प्रमाणात अवैध लाऊड स्पिकर लावले आहेत. हे सगळे लाऊड स्पिकर संजय पांडे यांनी उतरवायला हवेत, असे आवाहन कंबोज यांनी केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. मात्र आपल्या व्हीडिओच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नसून, लाऊड स्पिकरमुळे अभ्यास करणारी मुलं, वृद्ध नागरिकांना त्रास होत असल्याचं कंबोज यांनी म्हटलं आहे.