Brabourne Stadium : MI ची पहिली मॅच होणारं मुंबईचं ब्रेबॉर्न स्टेडिअम आहे कसं?
मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियम हे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मालकीचे आहे. तसेच बीसीसीआयचे मुख्य कार्यालय ब्रेबोर्नच्या नॉर्थ स्टँड येथे आहे. 1948 ते 1972 पर्यंत या स्टेडियमने अनेक क्रिकेटचे सामने बघितले आहेत. या ऐतिहासिक स्टेडियममध्ये एकूण 20,000 प्रेक्षक बसू शकतात.

Brabourne Stadium : मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियम हे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मालकीचे आहे. तसेच बीसीसीआयचे मुख्य कार्यालय ब्रेबोर्नच्या नॉर्थ स्टँड येथे आहे. 1948 ते 1972 पर्यंत या स्टेडियमने अनेक क्रिकेटचे सामने बघितले आहेत. या ऐतिहासिक स्टेडियममध्ये एकूण 20,000 प्रेक्षक बसू शकतात.
तसेच हे मैदान 1937 ते 1946 पर्यंत बॉम्बे पेंटाँग्युलर सामन्यांचे ठिकाण होते. सीसीएसोबत तिकीटावरून वाद झाल्यावर बॉम्बे क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमची निर्मिती केली. या मैदानावर क्रिकेटसोबतच टेनिस आणि फुटबॉलचे सामनेसुद्धा होतात. तसेच अनेक संगीत कार्यक्रमसुद्धा होतात. आयपीएल 2022चे 15 सामने याच मैदानावर होणार आहेत. तसेच 27 मार्चला दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हा पहिला सामना या मैदानावर होणार आहे.
2006 मध्ये झालेल्या ICC चैम्पियन्स ट्रॉफी आणि 2007मध्ये भारतात खेळलेले पहिले टी20 आंतरराष्ट्रीय सामन्याचा देखील हे मैदान साक्षीदार आहे. डिसेंबर 2009 मध्ये एक टेस्ट मॅच इथे झाली. तसेच अनेक सामन्याचे हे मैदान साक्षीदार आहे.
आता होणाऱ्या आयपीएल 2022चे 15 सामने या मैदानावर होणार आहेत. त्यातील 27 मार्चला होणारा दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हा पहिला सामना या मैदानावर होणार आहे. 20 मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्स मध्ये होणार सामना हा शेवटचा सामना या मैदानावर असेल.
हे आयपीएलचे सामने होणार ब्रेबोर्न स्टेडियमवर :-
27 मार्च 15:03 वाजता – 27 मार्च 15:30 बजे- दिल्ली कैपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियंस
31 मार्च 19:30 वाजता – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स
3 एप्रिल 19:30 वाजता – चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध पंजाब किंग्स
8 एप्रिल 19:30 वाजता – पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टाइटन्स
10 एप्रिल 15:30 वाजता – कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध दिल्ली कैपिटल्स
15 एप्रिल 19:30 वाजता – सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स
16 एप्रिल 15:30 वाजता – मुंबई इंडियंस विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स
18 एप्रिल 19:30 वाजता – राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स
23 एप्रिल 19:30 वाजता – रॉयल चैलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद
30 एप्रिल 15:30 वाजता – गुजरात टाइटन्स विरुद्ध रॉयल चैलेंजर्स बेंगलोर
5 मे 19:30 वाजता – दिल्ली कैपिटल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद
6 मे 19:30 वाजता – गुजरात टाइटन्स विरुद्ध मुंबई इंडियंस
13 मे 19:30 वाजता – रॉयल चैलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स
15 मे 19:30 वाजता – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
20 मे 19:30 वाजता – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स