क्राईम

मिथुनच्या नादाला लागला आणि पोलिसांना बडवून आला, त्याची अंडरवर्ल्डमध्ये एन्ट्री कशी झाली…

छोटा राजन हा मिथून चक्रवर्तीचा मोठा फॅन होता. तो मिथूनसारखे कपडे आणि त्याच्यासारखी हेअर स्टाईल करत असे.

Chota Rajan’s entry : 1981 सालीची गोष्ट आहे. यावेळेला मिथून चक्रवर्ती हा खूप फेमस आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा हिरो ठरला. याच्यासोबत अमिताभ बच्चनही फेमस होताच, पण मिथूनच्या चपळ अॅक्टिंगमुळे त्याचा एक वेगळाच फॅन फॉलोअर होता. आता या फॅन्समध्ये फक्त सामान्य नागरिक नव्हते. तर काही अंडरवर्ल्डशी कनेक्ट असलेले लोकही मिथूनला देव माणायचे.

त्यातलाच एक चाहता म्हणजे छोटा राजन. राजन निकाळजे म्हणजेच घरच्यांसाठी नाना आणि अंडरवर्ल्डसाठी छोटा राजन. छोटा राजन हा करिअरच्या सुरुवातीला फेमस चित्रपटांच्या तिकिटांचा काळा धंदा करायचा. त्याच्यासोबत त्याचे मित्रही होतेच.

छोटा राजन हा मिथूनचा मोठा फॅन होता. मिथून हा मारामाऱ्या करतो, डॅशिंग दिसतो, मिथूनची कपड्यांची स्टाईल, केसांची स्टाईल, असं सगळंच छोटा राजनला आवडायचं. छोटा राजन तर मिथूनसारखे कपडे आणि त्याच्यासारखी हेअर स्टाईल करत असे. असं सगळं सुरु असताना मिथूनचा सगळ्यात गाजलेला ‘साहस’ हा चित्रपट 1981 साली आला.

आधीच मिथूनचा कट्टर फॅन आणि त्यात मिथूनचा फेमस चित्रपट, याचाच फायदा राजनने घेण्याचं ठरवलं. आपल्या फंटरसोबत तो काळ्या तिकीटांचा धंदा करु लागला. पण पिक्चर एकदम हाऊसफूल्ल असल्याने तिकीटांचा दर अचानक वाढला. काऊंटरवर दर वाढल्याने राजननेही आपल्या तिकीटांचा दर वाढवला. हे मिथूनच्या चाहत्यांना पटलं नाही.

वाढीव दरामुळे मिथूनचे चाहते पोलिसांकडे गेले. पोलिसांकडे तक्रारी वाढू लागल्या, त्यामुळे राजनच्या फंटरला पोलिसांनी धारेवर धरलं. काही फंटरला तर पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. ही गोष्ट राजनला समजली. यामुळे राजनचा इगो दुखावला. राजनने पुढचा-मागचा विचार न करता पोलिसांची काठी हिसकावून राजनने पोलिसांवरच हमला केला.

पोलिसांवर हमला करणारी ही भारतातील त्या काळातील दुसरी टोळी होती. याआधी पठाणने पोलिसांवर हात उचलला होता. राजनने हात उचलल्यानंतर त्याच्या फंटरनेही पोलिसांना धारेवर धरलं. पोलिसांना काळे-निळे होईपर्यंत बदडलं. या घटनेमुळेच राजनची थेट अंडरवर्ल्डमध्ये चर्चा सुरु झाली. या सगळ्या पराक्रमामुळे राजन नायरने छोटा राजनची पाठ थोपाटली.

संबंधित बातम्या :

दाऊद इब्राहिमचा पिवळ्या रंगाच्या टीशर्टवरील फोटो आणि त्याच्या मागील कहाणी 

पोलिसांपासून वाचण्यासाठी अरुण गवळी महिलांच्या घोळक्यात लपायचा?

1993 च्या मुंबई हल्लातील गोष्टी समोर येणार, मोस्ट वॉन्टेड मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments