उद्धव ठाकरेंनी ED च्या कारवाईवरून सोडलं मौन, कार्यकर्ते, नेते, आमदारांना केलं अलर्ट
IT आणि ED च्या धाडी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेहुणा श्रीधर पाटणकरांपर्यंत जाऊन पोहचवल्या आहेत.

CM Uddhav Thackeray on ED Raids : महाराष्ट्रात ED, IT च्या धाडींचं सत्र वाढलंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपाप्रमाणे फक्त भाजपच्या विरोधकांवरच केंद्रीय संस्थांकडून धाडी टाकल्या जात आहेत. मात्र याच धाडी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मेहुणा श्रीधर पाटणकरांपर्यंत जाऊन पोहचवल्या आहेत.
या सगळ्याचे पडसाद अधिवेशनातही दिसून आले. विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये पाटणकरांवर झालेल्या कारवाईमुळे वातावरण तापलं होतं. तर बुधवारी, 23 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्येही या मुद्यावर चर्चा झाली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना एक संदेश दिला आहे.
लढत राहायचं! असे उद्गार मुख्यमंत्री ठाकरेंनी काढले आहेत. फक्त राष्ट्रवादी नाही, तर शिवसेनेचे अनेक नेतेही ED आणि IT च्या रडारवर आहेत. ही प्रक्रिया न थांबणारी आहे, त्यामुळे या प्रक्रियेला लढत राहायाचं, असा मेसेज मुख्यमंत्री ठाकरेंनी आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिला आहे.
शिवसेनेकडून अनेक मुख्यनेत्यांना आणि आमदारांनाही डिनर डिप्लोमसीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी आपल्या नेत्यांमध्ये स्फुर्ती भरण्याचं काम केलं होतं, अशी माहितीही समोर येत आहे.