CNG-PNG New Price : मुंबईत आता गॅसचे नवे दर कसे, स्वस्तातला गॅस कितीला मिळणार ?
दिवसेंदिवस सर्व वस्तूंचे भाव वाढतच आहेत. त्यातच पेट्रोल, डिझेलसोबत आता सीएनजीचे देखील भाव वाढत आहेत. लोकांनी पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्यामुळे सीएनजीला पसंदी दिली होती पण आता त्याचेपण दर वाढले. या प्राश्वभूमीवर आणि लोकांचा विचार करत राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सीएनजी आणि पीएनजी - पाईप्ड नॅचरल गॅस (घरगुती गॅस)च्या कराच्या कपात करायची घोषणा केली.

CNG-PNG New Price : देशभरात महागाईमुळे लोक त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस सर्व वस्तूंचे भाव वाढतच आहेत. त्यातच पेट्रोल, डिझेलसोबत आता सीएनजीचे देखील भाव वाढत आहेत. लोकांनी पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्यामुळे सीएनजीला पसंदी दिली होती पण आता त्याचेपण दर वाढले. या प्राश्वभूमीवर आणि लोकांचा विचार करत राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सीएनजी आणि पीएनजी – पाईप्ड नॅचरल गॅस (घरगुती गॅस)च्या कराच्या कपात करायची घोषणा केली. यामुळे सीएनजी आणि पीएनजी – स्वयंपाकाचा गॅस स्वस्त होणार अशी शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई आणि अन्य प्रमुख शहरात महापालिका निवडणुका येणार आहेत आणि यामुळेच हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. तसेच रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचे चटके सर्वच देशांना लागत आहे. त्याचे कारण असे की त्यामुळे सर्व खनिज तेलाच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल 130 डॉलरवर पोचलेला आहे. खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाल्याने सीएनजीच्या दरात सतत वाढ होत आहे. तसेच यामुळे पुढील काळात सीएनजी आणि पीएनजी – पाईप्ड नॅचरल गॅस (घरगुती स्वयंपाकाचा गॅस) याचे दर खूप पटीने वाढण्याची शक्यता आहे. या सर्वचा विचार करत सरकारने गॅसवरच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे लोकांना याची फार झळ लागणार नाही.
मुंबईत सीएनजी गॅस हा टॅक्सी आणि रिक्षा वाहनचालक त्यांच्या वाहनात वापरतात. त्यामुळे या वाहनचालकांना नाहक त्रास होत आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केल्यामुळे सीएनजीच्या दरात सतत वाढ होत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत महानगरात तब्बल 8 लाख सीएनजी आणि 18 लाख पीएनजी ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.