Corona Update In Mumbai : मुंबईत शुक्रवारी 78 कोरोना बाधित तर शून्य मृत्यू
4 मार्चला म्हणजेच काल शुक्रवारी मुंबईत फक्त 78 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सलग आठ दिवसांपासून शून्य मृत्यूची नोंद झाली आहे असे तिसऱ्या लाटेत आतापर्यंत 14 वेळा झाले आहे. तर रुग्णवाढीचा दर 0.01% एवढा आहे. तसेच रुग्णालयात केवळ 1.8% खाटा भरल्या आहेत.

Corona Update In Mumbai : 4 मार्चला म्हणजेच काल शुक्रवारी मुंबईत फक्त 78 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सलग आठ दिवसांपासून शून्य मृत्यूची नोंद झाली आहे असे तिसऱ्या लाटेत आतापर्यंत 14 वेळा झाले आहे. तर रुग्णवाढीचा दर 0.01% एवढा आहे. तसेच रुग्णालयात केवळ 1.8% खाटा भरल्या आहेत.
शुक्रवारी एकूण 19 हजार 737 चाचण्या करण्यात आल्या. त्या बाधित रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. तर लक्षणे असलेली एकूण 628 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी एकूण 327 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तसेच आतापर्यंत 10 लाख 36 हजार 634 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
आतापर्यंत फक्त मुंबईत 10 लाख 56 हजार 807 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 16 हजार 691 रुग्णांचा मृत्यू आतापर्यंत झाला आहे. तसेच आतापर्यंत एकूण 1 कोटी 62 लाख 57 हजार 572 चाचण्या करण्यात आल्या आहेत. 5645 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. तसेच मुंबईत डिसेंबर 2021 पासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरवात झाली. जानेवारी महिन्यात 1 वेळा, फेब्रुवारी महिन्यात 9 वेळा तर मार्च महिन्यात 4 वेळा असे मुंबईत आतापर्यंत 14 वेळा शून्य मृत्यू नोंद झाली आहे.