आपलं शहरबीएमसी

Vaccination Center In Mumbai : मुंबईत १२ वर्ष पूर्ण ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण, या लसीकरण केंद्रावर मिळेल लस

कोविड लसीकरण मोहिमेचा पुढील भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात बुधवारपासून 12 वर्षे पूर्ण ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचे कोविड-19 लसीकरण करण्‍यात येणार आहे. मुंबईतील 12 समर्पित केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजेपासून हे लसीकरण सुरु होणार आहे.

Vaccination Center In Mumbai : कोविड लसीकरण मोहिमेचा पुढील भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात बुधवारपासून 12 वर्षे पूर्ण ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्‍यांचे कोविड-19 लसीकरण करण्‍यात येणार आहे. मुंबईतील 12 समर्पित केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजेपासून हे लसीकरण सुरु होणार आहे. 12 समर्पित लसीकरण केंद्रांचा अभ्यास, अडचणी आणि प्रतिसाद पाहून आरोग्य सुविधांसह इतर बाबींचा विचार करुन त्यानंतर महानगरपालिकेच्या व शासनाच्या सर्वंच केंद्रांवर 12 ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे.

12 वर्षे पूर्ण ते 14 वर्षे वयोगटासाठी मुंबईतील लसीकरण केंद्रांची यादी

ई विभाग – टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर धर्मादाय रुग्णालय, मुंबई सेंट्रल

ई विभाग – ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय, नागपाडा, मुंबई सेंट्रल

एफ उत्तर विभाग –  लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय, शीव (पूर्व)

एफ दक्षिण – राजे एडवर्ड स्मारक  (के.ई.एम.) रुग्णालय, परळ

एच पूर्व – वांद्रे-कुर्ला संकुल (बी. के. सी.) जंबो कोविड लसीकरण केंद्र, वांद्रे (पूर्व)

के पूर्व – सेवन हिल्स रुग्णालय, वांद्रे (पूर्व),

के पश्चिम – डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम)

पी दक्षिण – नेस्को जंबो कोविड लसीकरण केंद्र, गोरेगांव (पूर्व),

आर दक्षिण – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालय, कांदिवली (पश्चिम),

एन विभाग – राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व).

एम पूर्व विभाग – पंडीत मदनमोहन मालवीय रुग्णालय (शताब्दी रुग्णालय), गोवंडी,

टी विभाग – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रुग्णालय, मुलुंड

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments