खूप काहीराजकारण

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमचा पिवळ्या रंगाच्या टीशर्टवरील फोटो आणि त्याच्या मागील कहाणी …

सध्या सभागृहात एकच नाव ऐकू येत आहे आणि ते म्हणजे दाऊद इब्राहिम. देवेंद्र फडणवीस यांनी 14 मार्चला सभागृहात एक pendrive सदर करत Mudassir lambe याचं नाव घेत Dawood सोबत संबंध असणाऱ्या लोकांना सरकारनियुक्त केल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. आणि राज्यभरात आरोपप्रत्यारोप सुरू झाले. 

Dawood Ibrahim : सध्या सभागृहात एकच नाव ऐकू येत आहे आणि ते म्हणजे दाऊद इब्राहिम. देवेंद्र फडणवीस यांनी 14 मार्चला सभागृहात एक pendrive सदर करत Mudassir lambe याचं नाव घेत Dawood सोबत संबंध असणाऱ्या लोकांना सरकारनियुक्त केल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. आणि राज्यभरात आरोपप्रत्यारोप सुरू झाले.

सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये देशद्रोह, नवाब मलिक आणि दाऊद यांच्यावरून चांगलाच वाद सुरू झाला आहे. 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिमने भारत सोडले त्यानंतर तो परत आलाच नाही. 1985 पर्यंत दाऊद इब्राहिमचे नाव संपूर्ण भारतात पसरले पण त्याचा चेहरा कोणालाच माहिती नव्हता, तो कसा दिसतो ? हे सुद्धा कोणालाच माहिती नव्हते.  त्यानंतर त्याचा पिवळ्या रंगाच्या टीशर्टवरील एक फोटो वृत्तपत्रात आला आणि दाऊद इब्राहिमचा चेहरा संपूर्ण भारताला दिसला.

त्यावेळी दुबईत भारत – पाकिस्तानचा सामना सुरू होता. दाऊद इब्राहिमसोबत छोटा राजन आणि अजून काही गुंड होते. भारताचा सामना होता त्यामुळे अनेक भारतीय पत्रकार तेथे होते. त्यामधील ‘इंडिया टुडे’चे छायाचित्रकार भवन सिंह यांच्या कानावर दाऊद… दाऊद.. असे ऐकू आले तेव्हाच त्यांनी दाऊदचे चार-पाच फोटो काढले.

भारतात आल्यावर भवन सिंहने सर्व फोटो संपादकाला दाखवले. पण नक्की हाच दाऊद इब्राहिम आहे का? हा प्रश्न सर्वाना होता कारण असे समोरासमोर खूप कमी लोकांनी त्याला पाहिले होते. अखेर शिक्कामोर्तब झाल्यावर त्यांनी दाऊदचा फोटो वृत्तपत्रात छापला. आणि संपूर्ण भारताने दाऊद इब्राहिम कासकरचा चेहरा बघितला. अजूनही गूगला दाऊद इब्राहिम टाकल्यावर त्याचा तोच पिवळ्या रंगाच्या टीशर्ट वरचा फोटो येतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments