आपलं शहरफेमस

Babulnath Temple In Mumbai : मुंबईतील बाबुलनाथ मंदिर का आहे प्रसिद्ध ? जाणून घ्या

महाराष्ट्रातील मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी इथे मरिन ड्राइव्हच्या शेवटच्या टोकाला असलेले बाबुलनाथ मंदिर हे संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात प्रचंड गर्दी असते. त्याचसोबत प्रत्येक सोमवारी या मंदिरात मोठी पूजा केली जाते.

Babulnath Temple In Mumbai : महाराष्ट्रातील मुंबईमध्ये गिरगाव चौपाटी इथे मरिन ड्राइव्हच्या शेवटच्या टोकाला असलेले बाबुलनाथ मंदिर हे संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात प्रचंड गर्दी असते. त्याचसोबत प्रत्येक सोमवारी या मंदिरात मोठी पूजा केली जाते.

बाबुलनाथ मंदिर हे सुप्रसिद्ध शिवमंदिर असून, राजा भीमदेव यांनी हे मंदिर 12 व्या शतकात बांधले आहे. हे मंदिर काळाच्या ओघात जमीनदोस्त झाले होते, मात्र, 1780 साली मंदिराचे काही अवशेष आढळून आल्याने त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. तसेच या मंदिराच्या जवळ 17.84 किलोमीटर मोठी नदी आहे.

असे मानले जाते की मंदिरामध्ये असलेले शिवलिंग बाभळीच्या झाडाच्या सावलीत सापडले होते त्यामुळे या मंदिराला बाबुलनाथ हे नाव ठेवले गेले. 1840 सालमध्ये या मंदिरात भगवान शिवच्या कुटुंबातील सदस्यांची मूर्ती बसविण्यात आली. ज्यामध्ये माता पार्वती, श्री गणेश, कार्तिकेय, नागदेव, हनुमान, शितलादेवी इत्यादी मूर्ती आहेत.

पौराणिक कथा आणि मंदिराच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग नावाच्या एका सोनाऱ्याकडे बाबूल नावाचा माणूस त्यांच्या गाई चरण्यासाठी कामाला होता. चराऊ जमीन असल्याने पांडुरंगाच्या गोठ्याची काळजी घेणाऱ्या बाबूलला काळजी घेण्यासारखे काहीच नव्हते. त्याच्या अनेक गाईंमध्ये एक कपिला नावाची गाय होती, जी सर्वात जास्त दूध देत असे. एकदा असे लक्षात आले की कपिला गायीने दूध देणे बंद केले. चौकशी केल्यावर, बाबूलने सांगितले की गाय, घरी येण्यापूर्वीच एका बिंदूवर पोहोचते आणि स्वतः तिचे सर्व दूध काढून टाकते. बाबूलला यामागचे तर्क स्पष्ट करता आले नाहीत, पण पांडुरंग जिज्ञासू होता. दुसर्‍याच दिवशी पांडुरंगाने ते दृश्य पुन्हा पाहिले आणि जेव्हा ती गाय कपिला तिच्या नेहमीच्या कृतीची पुनरावृत्ती करत होती तेव्हा तो भारावून गेला. तेथे पोहोचल्यावर एक मोठे शिवलिंग दिसले. हे तेच ठिकाण आहे जिथे मंदिर बांधले गेले आहे.

पहिल्यापासून ते आतापर्यंत अनेक भाविक इथे दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. कोरोनाच्या काळात ऑनलाईन दर्शन भाविकांसाठी सुरू होते. टेक्नॉलॉजीच्या काळात आता या मंदिराची वेबसाईट सुद्धा आहे. ज्यावर तुम्ही मंदिराचा इतिहास, फोटो असे अनेक गोष्टी पाहू शकता. www.babulnath.com ही त्यांची वेबसाईट आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments