ICC Women World Cup 22 : भारताची सेमिफायनलमध्ये जाण्याची आशा, भारताचे 229 धावा तर बांगलादेशचे 119 धावा
आयसीसी महिला विश्वचषक 2022च्या सेमिफायनलमध्ये भारताला जाण्याची आशा आहे. भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात भारताने 110 धावांनी बांगलादेशवर मात केली आहे.

ICC Women World Cup 22 : आयसीसी महिला विश्वचषक 2022च्या सेमिफायनलमध्ये भारताला जाण्याची आशा आहे. भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात भारताने 110 धावांनी बांगलादेशवर मात केली आहे. आज सकाळी भारताने टॉस जिंकून पहिले फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. स्मृतीने 30 आणि शेफालीने 42 असे दोघींच्या मिळून 72 धावा झाल्या. यानंतर यास्तिकाने अर्ध शतक केले. असाच खेळ खेळत भारताने 229 धावा केल्या.
भारताने केलेल्या 229 धावांसमोर बांगलादेशने फक्त 119 धावांच केले. आणि मिताली ब्रिगेडने आपला तिसरा विजय नोंदविला. यास्तिकाने सर्वाधिक 50 धावा केल्या आणि स्नेह राणाने 4 विकेट घेतल्या. यास्तिकाने 80 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 50 धावा पूर्ण केल्या.
230 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेश संघाचे खेळाडू सलमा खातून 32 आणि लता मोंडल 24 या दोघींनी भारतीय गोलंदाजीचा काही वेळ सामना केला. बाकीच्या कोणत्याही बांगलादेश संघाच्या फलंदाजाला जास्त धावा करता आल्या नाहीत. परिणामी बांगलादेशची हार झाली आणि भारताचा विजय झाला.