Indian Railway : भारतीय रेल्वेची नवीन सुविधा, रेल्वे स्थानकावरच मिळणार आधार आणि पॅन कार्ड !
भारतीय रेल्वे नेहमीच प्रवाशांसाठी वेगळी सुविधा उपलब्ध करून देतात. काहीतरी वेगळं अस या वेळेस भारतीय रेल्वेने केले आहे. आता रेल्वे स्थानकावर एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावरच पॅन कार्ड आणि आधार कार्ड मिळणार आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वे नेहमीच प्रवाशांसाठी वेगळी सुविधा उपलब्ध करून देतात. काहीतरी वेगळं अस या वेळेस भारतीय रेल्वेने केले आहे. आता रेल्वे स्थानकावर एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावरच पॅन कार्ड आणि आधार कार्ड मिळणार आहे.
रेल्वे स्थानकावर कियोस्क उभारण्यात येणार आहे. साधारण 200 रेल्वे स्थानकावर ही सुविधा उपलब्ध होणार आहे. ‘रेल्वे साथी किऑस्क’ असे त्याचे नाव आहे. तुम्ही रेल्वेची वाट बघत उभे असाल आणि तुमचा वेळ वाया नाही घालवायचा असेल तर तुम्ही तुमचे रेल्वे स्थानकावर पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवू शकता. पहिल्या टप्प्यात उत्तर-पूर्वच्या वाराणसी आणि प्रयागराज रामबाग येथे किऑस्क सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात बाकीच्या प्रमुख शहरात हे काम होईल.
या किऑस्कवर तुम्हाला या व्यतिरिक्त इतर काही कामे सुद्धा करता येतील. जसेकी तुम्ही कर भरणे, बँकिंगची काही कामे, विमाची कामे सुद्धा करू शकता. स्थानिक पातळीवर लहान सरकारी कामे हाताळण्यासाठी सरकारने कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) उघडण्यास सुरुवात केली आहे. यासाठी शासनाकडून परवाना घेणे आवश्यक आहे. इथे तुम्ही वीजबिल, फोन बिल, फोन रिचार्ज, विमा, आधार आणि पॅन कार्ड बनवणे अशी कामे केली जातात.