International Tourism : दोन देशांचा वाद, तरीही आंतरराष्ट्रीय विमानांचं तिकीट कमी होणार, कारण काय?
राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्बंध शिथिल करत विमानसेवा सुद्धा सुरू केली आहे. जवळपास 2 वर्षानंतर निर्बंध उठवल्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई तिकिटे 40% ते 50% पर्यंत स्वस्त होण्याची शक्यता आहे.

International Tourism : कोरोनाच्या प्राश्वभूमीवर अनेक निर्बंध देशात लावले होते. त्यात लोकल सेवा, बस सेवा, आंतरराष्ट्रीय विमानसेवा असे अनेक गोष्टी होत्या. पण आता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्बंध शिथिल करत विमानसेवा सुद्धा सुरू केली आहे. जवळपास 2 वर्षानंतर निर्बंध उठवल्यामुळे आंतरराष्ट्रीय हवाई तिकिटे 40% ते 50% पर्यंत स्वस्त होण्याची शक्यता आहे.
स्विस (Swiss) इंटरनॅशनल एअर लाइन्स ही लुफ्थांसा ग्रुपचा एक भाग आहे. येत्या काही महिन्यांत ही एअरलाइन्स जवळपास दुप्पट उड्डाणे अपेक्षित आहे. तसेच सिंगापूर एअरलाइन्स क्षमतेमध्ये 17% जोडण्याची योजना आखत आहे. इंडिगो एअरलाइन्सने म्हणजेच भारतीय विमानसेवा कंपनी असलेली ही कंपनी पुढील काही महिन्यांत 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची अपेक्षा आहे.
एव्हिएशन टर्बाइन इंधन (ATF)च्या किमती गेल्या वर्षीच्या 100% वाढीच्या तुलनेत वाढल्या आहेत. AFT म्हणजे विमानाच्या इंजिनासाठी इंधन म्हणून वापरले जाणारे उच्च प्रतीचे इंधन खनिज तेल. ATF किमतींमध्ये सतत वाढ केल्याने विमान भाड्यात लक्षणीय घट होण्याची शक्यता कमी होईल. इतरांना प्रवास खर्चात लक्षणीय घट झालेली दिसत नाही कारण वाढीव क्षमता इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे भरपाई केली जाते.
त्यामुळे येणाऱ्या काळात विमानप्रवास भाडे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच प्रवासी संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे. कोरोना काळात सर्वात जास्त फटका बसलेल्या क्षेत्रात विमानसेवा क्षेत्र देखील आहे.