स्पोर्ट

IPL 2022 Tickets : IPL 2022 ची तिकीट विक्री सुरू, जाणून घ्या कसे करायचे तिकीट बुक !

IPL 2022 ला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण भारताचे लक्ष IPL कडे आहे. आयपीएलचा हा पंधरावा हंगाम असून चाहत्यांसाठी खुशखबर आली आहे. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग आणि कोलकत्ता नाइट रायडर्स 26 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

IPL 2022 Tickets : IPL 2022 ला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे संपूर्ण भारताचे लक्ष IPL कडे आहे. आयपीएलचा हा पंधरावा हंगाम असून चाहत्यांसाठी खुशखबर आली आहे. आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग आणि कोलकत्ता नाइट रायडर्स 26 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

तसेच याची तिकीट विक्री आजपासून सुरू झाली आहे. तुम्ही याचे तिकीट ऑफलाईन पद्धतीने सुद्धा घेऊ शकता आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घेऊ शकता. ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच तुम्ही आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर (www.iplt20.com) जाऊन तिकीट काढू शकता. तसेच बुकमायशोच्या अधिकृत वेबसाईटवर (www.BookMyShow.com) जाऊन तिकीट काढू शकता. बुकमायशोच्या वेबसाईटनुसार, चार प्रकारचे तिकीटे आहेत.

26 मार्चच्या सामन्याची तिकीटे 2500, 3000, 3500 आणि 4000 रुपयांची तिकीटे आहेत. सामान्यांसाठी विक्री 800 रुपयांपासून ते 4000 पर्यंत सुरू आहे. मुंबई आणि पुण्यातील 4 स्टेडियमवर जवळजवळ आयपीएलचे 70 सामने होणार आहेत. यात मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियम, वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील या स्टेडियमवर सामने होणार आहेत. तसेच पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम गहुंजे येथे होणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments