Uncategorized

MI ने निवडलं ट्रायडेंट हॉटेल, तर DC, RR, PBKS, RCB, CSK च्या नावावर एकदम फाईव्ह स्टार्स हॉटेलचं सिलेक्शन

IPL 15 वा सीझन 26 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR0 आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होणार आहे.

IPL 2022 Update : IPL 15 वा सीझन 26 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR0 आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात होणार आहे. लीग सुरू होण्यापूर्वी सर्व संघ मुंबईत पोहोचत आहेत. बीसीसीआयने स्पर्धेपूर्वी पाच मैदानांवर सराव करण्याची परवानगी दिली आहे. त्याच वेळी, सर्व संघांनी 10 वेगवेगळ्या हॉटेलमध्ये त्यांच्या खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. MI ने (Mumbai Indians) ट्रायडेंट वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बुक केले आहे, तर DC चे खेळाडू ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये राहणार आहेत.

कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह वगळता, MI ने तीन दिवसांच्या क्वारंटाईनसाठी हॉटेलमध्ये आपल्या खेळाडूंना एकत्र करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धन यांनीही क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित, जसप्रीत 17 मार्च रोजी भारत विरुद्ध श्रीलंका कसोटीनंतर संघात सामील होतील तर सूर्यकुमार यादव, इशान किशन 16 मार्च रोजी त्यांच्या NCA, बेंगळुरू येथे प्री-IPL फिटनेस शिबिरानंतर संघात सामील होतील.

तीन दिवस क्वारंटाईन

दिल्ली कॅपिटल्सने ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये रणजी ट्रॉफी खेळाडूंसह एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. विदेशी खेळाडू 15 मार्चपर्यंत पोहोचतील. संघ बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना 3 दिवस क्वारंटाईन राहणे गरजेचे आहे.

रिलायन्सच्या मालकीच्या मुंबई इंडियन्सने IPL 2022 साठी संपूर्ण ट्रायडंट वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स बुक केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची पार्टनर असल्याने खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण हॉटेल मिळाले आहे. 14 मार्चपासून मुंबईचा सराव सुरू होणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबईचा सामना 27 मार्चला दिल्लीशी होणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये बूक केले आहे.

पंजाब किंग्स
पंजाब किंग्सचे खेळाडू पवईतील रेनेसान्स कन्व्हेन्शन सेंटर हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत.

चेन्नई सुपर किंग्स
एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज हा मुंबईत पोहोचणारा शेवटचा संघ असेल. CSK ची टीम नरिमन पॉइंटच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये राहणार आहे.

राजस्थान रॉयल्स
राजस्थान रॉयल्सची टीम अद्याप मुंबईत आलेली नाही. जयपूरमध्ये छोट्या शिबिरानंतर ते 16 मार्चपासून मुंबईत राहायला येणार आहे.

गुजरात टायटन्स
गुजरात टायटन्सही मुंबईत उशिरा पोहोचेल. 20 मार्च रोजी सरावासाठी मुंबईला जाण्यापूर्वी ते अहमदाबादमध्ये IPL पूर्व शिबिर सुरू करतील. मुंबईतील मुक्कामादरम्यान हे खेळाडू जेडब्ल्यू मॅरियट येथे राहतील. पुण्यात त्यांचा मुक्काम कोनराड हॉटेलमध्ये असणार आहे.

लखनौ सुपर जायंट्स
लखनौ सुपर जायंट्स मुंबईतील कुलाबा येथील ताज विवांता येथे मुक्काम करणार आहेत. वानखेडे स्टेडियमवर ते 27 मार्चला गुजरात जायंट्सविरुद्ध खेळणार आहेत.

सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद आयटीसी मराठा येथे राहणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments