बीएमसी

आता मुंबई पालिकेवर कोणाची सत्ता, प्रशासकाचं काम काय?

तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की प्रशासकाचं काम काय असणार? एकटे इक्बाल सिंह चहल काय काय काम करणार आहेत?

BMC Election update : 7 मार्च 2022 ही मुंबई महापालिका सत्तेची शेवटची तारीख होती. यानंतर महापालिकेमध्ये ना नगरसेवक काम करू शकतात, ना महापौरांचा कुठला अधिकार या पालिकेवर असणार आहे. मग प्रश्न उपस्थित होतो की पालिकेवर नेमका कोणाचा ताबा असणार, तर उत्तर आहे प्रशासनक. प्रशासक म्हणजे पालिकेचे आयुक्त. ते आहेत इक्बाल सिंह चहल. एकंदरित इक्बाल सिंह चहल हेच आता संपूर्ण मुंबई महापालिकेचा कारभार सांभाळणार आहेत.

मग तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की प्रशासकाचं काम काय असणार? एकटे इक्बाल सिंह चहल काय काय काम करणार आहेत?

या संबंधित इंडियन एक्सप्रेसने सविस्तर वृत्त दिलं आहे. त्याच्याच आधारे सांगायचं झाल्यास, देशातील सर्वात मोठ्या नागरी महामंडळांपैकी एक असलेली बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ही प्रशासकाद्वारे चालवली जाईल.

याआधी 227 नगरसेवकांच्या आधारावर ही महापालिका चालवली जायची. आता ते मंगळवारपासून (7 मार्च 2022 पासून) बंद झालेलंं आहे. आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि विविध विभागाचे एचओडी यांचा समावेश असलेली प्रशासकीय शाखा आता BMC चालवतील आणि आर्थिक प्रस्ताव मंजूर करतील सोबतच धोरणात्मक निर्णय घेतील.

प्रशासकाची नेमणूक किती काळासाठी?

ज्यावेळेस BMC ची  निवडणूक लढवली जाईल. तेव्हा एखादा पक्ष जिंकून येईल. त्या पक्षाचा महापौर महापालिकेवर असेल. तेव्हा महापालिकेची पहिली बैठक होईल आणि याच बैठकीपर्यंत प्रशासकाची पालिकेचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी असेल.

आपण म्हटल्या प्रमाणे प्रशासक किंवा महानगरपालिका आयुक्त इथून पुढचा सर्वप्रकारचा कारभार सांभाळतील. BMC च्या चार अतिरिक्त आयुक्तांची या मुख्य प्रशासकांना मदत होईल. 27 सदस्यांच्या स्थायी समितीच्या बैठकीत जे प्रस्ताव मांडण्यात आले होते, त्याची जबाबदारी त्या त्या विभागप्रमुख प्रशासकाकडे दिली जाईल. संबंधित उपमहापालिका आयुक्त आणि प्रभाग अधिकारी यांचं त्या कामावर नियंत्रण असेल. प्रस्ताव मंजूर करण्याचा अंतिम अधिकार मात्र मुख्य प्रशासकाचा असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments