घटना

सेक्स वर्करने फोडलं गुपित, कामाठीपुराचं आणखी एक सत्य पडलं बाहेर

कामाठीपुरामध्ये राहणाऱ्या महिलांना भूक, शारीरिक हिंसा, भावनिक आणि लैंगिक हिंसाचाराचा अनेकदा प्रत्यय आलेला असतो.

Kamathipura Real Condition : मुंबईतील कामाठीपुरा परिसर हा सेक्स वर्कसाठी देशभरात ओळखला जातो. अशा महिला मोठ्या संख्येने येथे राहतात, ज्या सेक्स वर्क म्हणून काम करतात. एकदा येथे आल्यावर महिलांना या व्यवसायातून बाहेर पडणं कधीच जमत नाही.

प्रेरणा या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग एनजीओने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अशा अनेक महिलांच्या कथा सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या कथांमध्ये महिलांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दलही काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

त्यातील एक महिलेने आपला अनुभव सांगितला.

मी 55 वर्षांची आहे, जवळजवळ माझे संपूर्ण आयुष्य सेक्स वर्कर म्हणून काम करण्यात गेलं. आतापर्यंतच सगळं आयुष्य कामाठीपुरामध्ये गेलं. ती तरुण असताना तिला अनेक हॉटेल्समध्ये पाठवलं जायचं. इथले दलाला प्रत्येक नवीन मुलीला वाईट वागणूक द्यायचे. आता ती सेक्स वर्कच्या व्यवसायात करत नाही, आता तिने एका एनजीओमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. त्यांची दोन्ही मुलं त्या NGO साठी काम करतात.

ती स्वतः ठाण्यात भाड्याच्या घरात राहते. पण एवढे करूनही ‘कामाठीपुरामध्ये राहिलेली स्त्री’ ही ओळख तिची पाठ सोडत नाही. मोहिनी नावाच्या दुसऱ्या महिलेनेही तिचे असेच काहीसे अनुभव शेअर केले आहेत. ती कामाठीपुरा येथे गेल्या 15 वर्षांपासून राहत आहे. ती एका वेश्यालयातून दुसऱ्या वेश्यालयात जात आहे. तिचं म्हणणं आहे की, तिचं आयुष्य इथं कधीच सोपं नव्हतं आणि इथे राहणाऱ्या इतर कोणत्याही महिलेला आयुष्य जगणं सोपं नव्हतं.

कामाठीपुरामध्ये राहणाऱ्या महिलांना भूक, शारीरिक हिंसा, भावनिक आणि लैंगिक हिंसाचाराचा अनेकदा प्रत्यय आलेला असतो. मुंबईमध्ये येणाऱ्या अशा अनेक मुली असतात, ज्यांना मुंबईतील अनेक गोष्टींबद्दल माहिती नसते. मग त्या इथल्या दलालांना फसतात. मुंबईतील काहीच अनुभव नसलेल्या मुलींची एकप्रकारे शिकार होते आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं.

कामाठीपुरा हा जरी मुख्य रस्त्यावरून बरा वाटणारा भाग वाटला तरी मात्र त्याच्या आतील गल्ल्या ह्या खुपच गलिछ्छ आहेत. तिथे तुम्ही साधे चालताना नाकावर रुमाल न्याल तर तिथे राहण्याची कल्पनाही करू शकत नाही. असं मतही तिथून बाहेर पडलेल्या एका महिलेने मांडलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments