आपलं शहर

Metro 2A Line : मेट्रो स्टेशनची ‘ही’ 15 नावं आयुष्यभर लक्षात ठेवा

2022 मध्ये मुंबईकरांना शहराच्या उपनगरात 2 नवीन मेट्रो मार्ग मिळणार आहेत. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए 35 किमी लांबीचे दोन उन्नत मेट्रो कॉरिडॉर बांधत आहे, अशी माहिती मिळाली आहे.

Metro 2A Line : 2022 मध्ये मुंबईकरांना शहराच्या उपनगरात 2 नवीन मेट्रो मार्ग मिळणार आहेत. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीए 35 किमी लांबीचे दोन उन्नत मेट्रो कॉरिडॉर बांधत आहे, अशी माहिती मिळाली आहे.

लाइन 2A आणि लाइन 7वर दहिसर आणि DN नगर तसेच दहिसर पूर्व आणि अंधेरी पूर्व दरम्यान धावेल. या दोन लाइन पूर्व आणि पश्चिम बाजूने समांतर चालणार असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावरील गर्दी कमी होण्याची अपेक्षा आहे. व्यावसायिक कामकाजाचे टप्प्याटप्प्याने नियोजन केले जात आहे, अशी माहिती मिळाली आहे.

तसेच सध्या, MMRDA आरे, दहिसर पूर्व, आनंद नगर आणि डहाणूकरवाडी दरम्यानच्या मार्गांची अंशतः चाचणी करत आहे. पहिल्या टप्प्यात, 2A आणि 7 कॉरिडॉरमध्ये 18 स्थानके समाविष्ट होतील. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (CMRS) कडून मंजुरी मिळाल्यावर, पहिला टप्पा व्यावसायिक ऑपरेशनसाठी खुला होईल, अशी माहिती मिळाली आहे.

तसेच 2A मेट्रो लाईनवरील अनेक स्थानकांची नावे एमएमआरडीए बदलीली आहेत. त्यांची जुनी व नवीन नावे खालीलप्रमाणे :-
• D N नगरचे नाव बदलून अंधेरी (पश्चिम) करण्यात आले आहे
• शास्त्री नगरचे नाव बदलून लोवर ओशिवारा करण्यात आले आहे
• आदर्श नगरचे नाव ओशिवारा करण्यात आले आहे
• गोरेगाव मेट्रोचे नाव गोरेगाव (पश्चिम) करण्यात आले आहे
• बंगुर नगरचे नाव पहाडी गोरेगाव करण्यात आले आहे
• कस्तुरी पार्कचे नाव लोवर मलाड करण्यात आले आहे.
• मलाड मेट्रोचे नाव मलाड (पश्चिम) करण्यात आले आहे
• चारकोपचे नाव वलणाई करण्यात आले आहे
• कामराज नगरचे नाव डहाणूकरवाडी करण्यात आले आहे
• महावीर नगरचे नाव कांदिवली (पश्चिम) करण्यात आले आहे
• शिंपोळीचे नाव पहाडी एक्सर करण्यात आले आहे
• बोरिवली (पश्चिम)चे नाव डॉन बॉस्को करण्यात आले आहे
• IC कॉलनीचे नाव मंडपेश्वर करण्यात आले आहे
• इयुषी संकुलचे नाव कंदारपाडा करण्यात आले आहे
• अप्पर दहिसरचे नाव आनंद नगर करण्यात आले आहे

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments