स्पोर्ट

MI चा पहिलाच सामना तगड्या संघाविरुद्ध; पाहा कसं असेल मुंबईचं संपूर्ण वेळापत्रक

कोरोनामुळे IPL 2022 ही संपूर्णरित्या महाराष्ट्रातील फक्त 4 मैदानांवर खेळवली जाणार आहे. याचं कारण म्हणजे IPL च्या सामन्यांसाठी इतके तिकडे संघांना धावपळ करावी लागणार नाही.

MI Match Schedule 2022 : IPL 2022 ची तयारी सुरु झालीये. या स्पर्धेसाठी सर्व संघ लवकरच प्रॅक्टिसला सुरुवात करतील. IPL 2022 ची सुरुवात 26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. यासह बीसीसीआयने (BCCI) या वर्षासाठी संपूर्ण आयपीएल वेळापत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये 5 वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे.

कोरोनामुळे IPL 2022 ही संपूर्णरित्या महाराष्ट्रातील फक्त 4 मैदानांवर खेळवली जाणार आहे. याचं कारण म्हणजे IPL च्या सामन्यांसाठी इतके तिकडे संघांना धावपळ करावी लागणार नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट आयपीएलपासून दूर असेल. आयपीएलचे 55 सामने मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉन आणि डीवाय पाटील स्टेडियमवर, तर 15 सामने पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहेत. IPL 2022 मध्ये लीग टप्प्यातील एकूण 70 सामने खेळवले जातील.

मुंबई इंडियन्सचे पूर्ण वेळापत्रक

27 मार्च: DC vs MI, ब्रेबॉर्न स्टेडियम – 3:30 PM
2 एप्रिल: MI vs RR, DY पाटील स्टेडियम – 3:30 PM
6 एप्रिल: KKR vs MI, MCA स्टेडियम, पुणे, – 7:30 PM
9 एप्रिल: RCB vs MI, MCA स्टेडियम, पुणे, 7:30 PM
13 एप्रिल: MI vs PBKS, MCA स्टेडियम, पुणे, 7:30 PM
16 एप्रिल: MI vs LSG, ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई, 3:30 PM
21 एप्रिल: MI vs CSK, डॉ. डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई, 7:30 PM
24 एप्रिल: LSG vs MI, वानखेडे स्टेडियम, मुंबई, 7:30 PM
30 एप्रिल: RR vs MI डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडिअम, मुंबई, 7:30 PM
6 मे : GT vs MI, ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई, 7:30 PM
9 मे: MI vs KKR, DY पाटील स्टेडियम 7:30 PM
12 मे: CSK vs MI, वानखेडे स्टेडियम, मुंबई, 7:30 PM
17 मे: MI vs SRH, वानखेडे स्टेडियम, मुंबई, 7:30 PM
21 मे: MI vs DC, वानखेडे स्टेडियम, 7:30 PM

IPL 2022 मध्ये 2 ज्यादाच्या संघांमुळे फॉरमॅटमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. यावेळी IPL मधील 10 संघ 5-5 च्या 2 गटात विभागले गेले आहेत. ज्यामध्ये ‘अ’ गटात मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा समावेश आहे, तर ‘ब’ गटात चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्स त्यांच्या गटातील सर्व संघांकडून प्रत्येकी दोन सामने खेळेल, तर दुसऱ्या गटात फक्त चेन्नई 2 सामने खेळेल आणि बाकीचे 1-1 सामने खेळतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments