स्पोर्ट

मुंबई इंडियन्सचे Top – 10 हिरो, पाहा कसा असेल प्लॅन

IPL च्या 15 व्या हंगामासाठी आता एका महिन्याहून कमी वेळ शिल्लक राहिला आहे. या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Mumbai Indians Full Squad : IPL च्या 15 व्या हंगामासाठी आता एका महिन्याहून कमी वेळ शिल्लक राहिला आहे. या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, 26 मार्चपासून या लीगची सुरुवात होईल. यावेळी 10 संघ मैदानात उतरणार आहेत.

आयपीएलचा सर्वात यशस्वी मानला जाणारा संघ मुंबई इंडियन्सही ब गटातून उतरणार आहे. 5 वेळा विजेता मुंबई इंडियन्स संघही 6 वा IPL कप जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. यातच त्यांची प्लेइंग-11 कोण असू शकते, हे आपण पाहणार आहोत.

रोहित शर्मा (कर्णधार)

मुंबई इंडियन्सच्या यशात सर्वात मोठा वाटा कर्णधार रोहित शर्माचा आहे. रोहित शर्मा या हंगामात फलंदाजी आणि कर्णधारपद सांभाळत आहे.

इशान किशन (यष्टीरक्षक)

मुंबई इंडियन्सच्या संघात यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून इशान किशनला संधी देण्यात आली आहे. इशान किशनला यावेळी सर्वाधिक पैसे देऊन मुंबई इंडियन्सने आपल्याकडे घेतले आहे.

सूर्यकुमार यादव

भारतीय संघाचा स्टार फलंदाज असलेला सूर्यकुमार यादव यावेळी मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीतील सर्वात महत्त्वाचा फलंदाज म्हणून काम पाहणार आहे.

किरॉन पोलार्ड

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डवर मुंबई इंडियन्सने विश्वास कायम ठेवला आहे.

टीम डेव्हिड

यावेळी सिंगापूरचा एकमेव खेळाडू टीम डेव्हिडला आयपीएलमध्ये स्थान मिळाले आहे. टीम डेव्हिडने अलीकडच्या काळात आपल्या चांगला खेळ केला होता. बिग-बॅश लीगसह पीएसएलमध्येही त्याने चांगली कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याच्या जागेवर टीमला घेण्यात आलं आहे.

टिळक वर्मा

हैदराबादचा 19 वर्षीय फलंदाज एन टिळक वर्मा हा आक्रमक फलंदाज आहे. जो सहजासहजी मोठे षटकार मारू शकतो.

डॅनियल सॅम्स

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्स गेल्या काही मोसमांपासून आयपीएल खेळत आहे.

फॅबियन ऍलन

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू फॅबियन अॅलन हादेखील उत्तम आक्रमक फलंदाज आहे. फॅबियन ऍलन हा मुंबई इंडियन्सला फायद्याचा ठरू शकतो.

जयदेव उनाडकट

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला यावेळी कमी मागणी होती. पण त्याला मुंबई इंडियन्सने आपल्याकडे घेतले आहे.

जसप्रीत बुमराह

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबद्दल चर्चा कमी झाल्यात. तरीही मुंबईने त्याला आपल्याकडे घेतले आहे.

मुरुगन अश्विन

मुंबई इंडियन्सचा स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाजाबद्दल बोलायचे तर तो फक्त मुरुगन अश्विनच असू शकतो.

हे मुंबई इंडियन्सचे प्लेइंग-11 असू शकतात

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, तिलक वर्मा, डॅनियल सॅम्स, फॅबियन ऍलन, जसप्रीत बुमराह, मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments