लोकल

मुंबईच्या मेट्रो स्टेशनवर सुरु होणार नवा प्रकल्प, MMRDA ची नवी माहिती

एमएमआरडीएकडून 25 वर्षांच्या कालावधीसाठी RESCO कंपनीला सौर उर्जेचं काम देण्याचं नियोजन केलं जात आहे.

Mumbai Metro Update : मेट्रो लाईन 2 A (दहिसर ते DN नगर) आणि 7 (दहिसर E ते अंधेरी E) स्थानकांवरील सर्व स्थानकांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. एमएमआरडीएकडून 25 वर्षांच्या कालावधीसाठी RESCO कंपनीला सौर उर्जेचं काम देण्याचं नियोजन केलं जात आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर MMRDA च्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. “स्टेशन्सवर हरित प्रकल्प सादर करणे हा यामागचा उद्देश आहे. यामुळे स्टेशन परिसर ग्रीन बिल्डिंगच्या श्रेणीत येईल. यामुळे भविष्यात कर सवलतदेखील मिळू शकेल.

धनुकरवाडी आणि आरे दरम्यान मेट्रो लाईन 2A आणि 7 वरील 20 किमीचा टप्पा 1 मार्च अखेरीस सुरू करण्याचा प्लॅन MMRDA कडून आखण्यात आला आहे. मात्र, रेल्वे सुरक्षाचे प्रमाणपत्र मिळणे बाकी आहे. एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी यापूर्वी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना माहिती दिली होती.

“20 किमी लांबीच्या मार्गावर सर्व 18 स्थानके तयार आहेत. आणि लवकरच उर्वरित मार्गदेखील पूर्ण केला जाईल आणि या वर्षापर्यंत संपूर्ण कॉरिडॉर लोकांसाठी खुला केला जाईल.”

10 मेक इन इंडिया रेकनुसार MMRDA मेट्रो लाईन 2A आणि 7 वर व्यावसायिक ऑपरेशन्स चालवणार आहेत. MMRDA रायडरशिप असेसमेंट अभ्यासानुसार सुरुवातीच्या रोजच्या प्रवाशांची संख्या सुमारे 5.28 लाख असू शकते. जे 2031 पर्यंत 6.68 लाखांपर्यंत वाढेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments